Languages

   Download App

Live Sai Darshan - Video Popup

Live Sai Darshan - Video Popup

Undefined

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून यानिमित्‍ताने मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात ५८ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) व सर्व्‍हे नं.०१ त्रिकोणी जागेत आदी ठिाकणी ३५ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. साईभक्‍तांना लाडू प्रसाद पाकिटांचा लाभ सुलभतेने मिळावा म्‍हणून गेट नं.०४ जवळ ०२ अतिरिक्‍त लाडू विक्री काऊंटर सुरु करण्‍यात येणार आहे.

तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) मंडपात, सर्व्‍हे नं.०१ त्रिकोणी जागेतील मंडपात आणि साईनिवास अतिथीगृहाच्‍या समोरील बायोमॅट्रीक काऊंटर समोरील मंडपात चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. याकालावधीत भक्‍तांच्‍या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात, साईआश्रम, जुने साईप्रसादालय दर्शन रांगेजवळ व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून तातडीचे सेवेसाठी याठिकाणी रुग्‍णवाहीका ही तैनात ठेवण्‍यात येणार आहे.

भाविकांच्‍या सुरक्षेसाठी ५० अतिरीक्‍त सीसीटीव्‍ही कॅमेरे, ७ एल.ई.डी. स्क्रिनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच सुरक्षेकामी ०१ पोलिस निरिक्षक, ०३ पोलिस उपनिरिक्षक, ७५ पोलिस कर्मचारी, एक सिघ्र कृतीदल पथक (२० व्‍यक्‍ती), एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त २०० पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात येवून याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे ११०७ सुरक्षा कर्मचारी आहेत. सशुल्‍क पासेससाठी ०३ अतिरिक्‍त काऊंटर सुरु करण्‍यात आले असून सर्व्‍हे नं.०१ त्रिकोणी जागेत जेष्‍ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी स्‍वतंत्र काऊंटर आणि पोलिस मदत केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहेत.

नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले असून दुपारी ४ ते ५ यावेळेत अवघेश चंदन भारव्‍दाज, लखनऊ, सायं.६.३० ते ७.३० यावेळेत वनिता बजाज, दिल्‍ली, सायं.७.४५ ते ८.४५ यावेळेत डॉ.पुजा राठोड, जयपूर, रात्रौ ९ ते १० यावेळेत नर्सिंग देसाई, पुणे व रात्रौ १०.१५ ते १२ यावेळेत श्री साई स्‍वरांजली संगीत संच, नागपूर आदी कलाकारांचे साईभजन संध्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार असल्‍याचे सांगुन शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या साईभजन संध्‍या कार्यक्रमांचा जास्‍तीत-जास्‍त श्रोत्‍यांनी लाभ घ्‍यावा असे आवाहनही श्री.मुगळीकर यांनी केले.

News Date: 
Thursday, December 26, 2019