Languages

   Download App

अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा दिक्षांत समारंभ कार्यक्रम

अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा दिक्षांत समारंभ कार्यक्रम

शिर्डी -
          देश औद्योगिक क्रांती करीत असताना आय.टी.आय. प्रशिक्षण घेतलेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांना यापुढील काळात अतिशय उज्‍वल भवितव्‍य असल्‍याचे प्रतिपादन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा आयोजित करण्‍यात आलेल्‍या दिक्षांत समारंभ कार्यक्रमात केले.
            दिक्षांत समारंभ हा पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या धर्तीवर केंद्र सरकारने या वर्षापासुन विश्‍वकर्मा दिवसाचे (१७ सप्‍टेंबर) औचित्‍य साधुन औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थाचे विद्यार्थ्‍यांसाठी सुरु केलेला आहे. या विश्‍वकर्मा दिनाचे औचित्‍य साधुन श्री साईबाबा संस्‍थानच्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांचेतर्फे ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये (आय.टी.आय.) उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा दिक्षांत समारंभ कार्यक्रम आज दिनांक १७ सप्‍टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता शैक्षणिक संकुलाचे सांस्‍कृतिक हॉल मध्‍ये संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आला होता.
             याप्रसंगी श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थाचे टुल अॅण्‍ड डायमेकर व्‍यवसायातील प्रशिक्षणार्थी प्रविण गायकोट याचा राज्‍यात द्वितीय व साई मोरे याचा राज्‍यात तृतीय क्रमांक. तसेच मेकॅनिकल ट्रॅक्‍टर या व्‍यवसायाचा प्रशिक्षणार्थी दिपक जगताप याचा राज्‍यात तृतीय क्रमांक आल्‍याबद्दल संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते स्‍मृतिचन्‍ह व प्रमाणपत्र देवुन त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला. तसेच संस्‍थेतील आकरा व्‍यवसायातुन प्रथम तिन क्रमांकाने उत्‍तीर्ण झालेल्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. तसेच यावर्षी श्री साईबाबा औद्योगिक प्र‍शिक्षण संस्‍थेचा निकाल ८९ टक्के लागल्‍याबद्दल श्रीमती बानायत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
               या कार्यक्रमाप्रसंगी संस्‍थानचे प्रशासकिय अधिकारी दिलीप उगले, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य अभय दुनाखे, गटनिदेशक रामनाथ चौधरी, दादा जांभुळकर, इंग्लिश मिडीयम स्‍कुलचे प्राचार्य असिफ तांबोळी, श्रीमती शिल्‍पा पुजारी, औ.प्र.संस्‍थेचे कर्मचारी वर्ग, यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे पालक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Undefined
अखिल भारतीय व्‍यवसाय परीक्षेमध्‍ये उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांचा दिक्षांत समारंभ कार्यक्रम
Sunday, September 18, 2022 - 10:15
Donation Live Darshan