Languages

   Download App

गोकुळ आष्टमी

गोकुळ आष्टमी

फोटोची माहिती

       श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने "गोकुळ आष्टमी" निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ  १०.०० ते १२.०० यावेळेत श्रीकृष्णजन्म कीर्तन झाले. त्यानंतर रात्रौ  १२.०० संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याहस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री अविनाश दंडवते, सचिन गुजर, महेंद्र शेळके, सचिन कोते, सहआयुक्त आयकर विभाग नासिक संजय धिवरे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी व कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर श्रींची शेजारती झाली.

 

फोटोची माहिती

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने "गोपालकाला" निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या समोरील स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत गोपालकाला कीर्तन झाले. त्‍यानंतर दुपारी १२.०० वाजता समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, सुनिल शेळके, सचिन कोते, सहआयुक्त आयकर विभाग नासिक संजय धिवरे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
   श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने "गोकुळ आष्टमी" निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ  १०.०० ते १२.०० यावेळेत श्रीकृष्णजन्म कीर्तन झाले. त्यानंतर रात्रौ  १२.०० संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याहस्ते
Friday, August 19, 2022 - 15:15
Donation