Languages

   Download App

 राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. सध्‍या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिरात प्रवेश करताना यापुर्वी करण्‍यात आलेले नियम नेहमीप्रमाणे सुरु राहतील. तसेच श

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी

शिर्डी -

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. सध्‍या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिरात प्रवेश करताना यापुर्वी करण्‍यात आलेले नियम नेहमीप्रमाणे सुरु राहतील. तसेच श्रीं च्‍या दर्शनाकरीता साधारणपणे १५००० भाविकांना दर्शन देता येईल. त्‍यामुळे साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे, असे नम्र आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात आलेले आहे.

दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सध्‍या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्‍याअनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवु नये म्‍हणुन सलग ०२ किंवा ०२ पेक्षा जास्‍त दिवस सलग सुट्टीचे कालावधीत तसेच गुरुवार, शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी अथवा महत्‍वाचे धार्म‍िक दिवशी श्री साईबाबांचे दर्शन घेऊ ईच्छिणा-या साईभक्‍तांनी या कालावधीत शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येतानी संस्‍थानच्‍या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. online.sai.org.in या वेबसाईटव्‍दारे सशुल्‍क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्‍याचे तारखेपासून पुढील ०५ दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्‍याचे तारखेपासून पुढील ०२ दिवसांसाठी उपलब्‍ध असेल. (यात दर्शनाचा दिवस अंतर्भूत नाही.) अधिक माहितीसाठी संस्‍थानच्‍या www.sai.org.in या संकेतस्‍थळावर संपर्क करावा.

 

तसेच मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना, १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे. जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. सर्व साईभक्‍तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्‍याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्‍ध करुन निर्धारीत वेळेत श्रीं च्‍या दर्शनाकरीता यावे.

Undefined
राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. सध्‍या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिरात प्रवेश करताना यापुर्वी करण्‍यात आलेले नियम नेहमीप्रमाणे सुरु राहतील. तसेच श
Tuesday, February 23, 2021 - 10:45