Languages

   Download App

 शासनाच्‍या वतीने राज्‍यामध्‍ये कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना प्रतिबंधात्‍मक निर्बंध होते. मात्र दिनांक १० नोव्‍हेंबर २०२१ च्‍या शासन आदेशाने कोरोना प्रतिबंधात्‍मक लसच

शासनाच्‍या वतीने राज्‍यामध्‍ये कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये गरोदर

शिर्डी - शासनाच्‍या वतीने राज्‍यामध्‍ये कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना प्रतिबंधात्‍मक निर्बंध होते. मात्र दिनांक १० नोव्‍हेंबर २०२१ च्‍या शासन आदेशाने कोरोना प्रतिबंधात्‍मक लसची दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पुर्ण झालेल्‍या गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पासुन श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनाकरीता प्रवेश देण्‍यात येत असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली. श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. पुन्‍हा राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०२१ पासून काही अटी शर्तीवर धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले होते. यामध्‍ये भाविकांनी दर्शनाकरीता जाताना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व्‍यक्‍ती व आजारी व्‍यक्‍तींना प्रतिबंधात्‍मक निर्बंध होते. मात्र राज्‍याशासनाने दिनांक १० नोव्‍हेंबर २०२१ रोजी काढलेल्‍या अध्‍यादेशानुसार कोरोना प्रतिबंधात्‍मक लसची दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पुर्ण झालेल्‍या गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये प्रवेश देण्‍याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पासुन अमंलबजावणी सुरु करण्‍यात आली असून याबाबत आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत. गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींनी श्रींच्‍या दर्शनाकरीता येताना कोरोना लसींच्‍या दोन्‍ही मात्रा घेतल्‍या असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र व आपले आधारकार्ड सोबत बाळगावे. मात्र शासनाच्‍या आदेशानुसार कोरोना लसीची दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पुर्ण झालेल्‍याच गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाईल याबाबतची सर्व साईभक्‍तांनी नोंद घ्‍यावी व याबाबतची खात्री करुनच शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा आपली गैरसोय होऊ शकते. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याकामी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.
Undefined
शासनाच्‍या वतीने राज्‍यामध्‍ये कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर धार्म‍िकस्‍थळे, प्रार्थनास्‍थळे यामध्‍ये गरोदर स्त्रिया व ६५ वर्षाच्‍या पुढील व्‍यक्‍तींना प्रतिबंधात्‍मक निर्बंध होते. मात्र दिनांक १० नोव्‍हेंबर २०२१ च्‍या शासन आदेशाने कोरोना प्रतिबंधात्‍मक लसच
Saturday, November 13, 2021 - 17:45