Languages

   Download App

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सव मुख्य दिवस

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सव मुख्य दिवस

फोटो नंबर ०१) श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवाच्या मुख्यदिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा  यांनी पोथी, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी विणा, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे व दिलीप उगले यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नासिक संजय धिवरे, सौ.मालती यार्लगड्डा, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, शिर्डी  ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो क्र.०२) श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नासिक संजय धिवरे, सौ.मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.

फोटो०३) श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रशासकी अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते. 

Undefined
श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सव मुख्य दिवस
Wednesday, October 5, 2022 - 13:15