Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थानला आयकरात १७५ कोटी रुपये कर माफी

श्री साईबाबा संस्‍थानला आयकरात १७५ कोटी रुपये कर माफी

शिर्डी-

          आयकर विभागाने सन २०१५-१६ चे करनिर्धारण करताना श्री साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसुन धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरुन दक्षिणापेटीत आलेल्या दानावरती ३० टक्के आयकर आकारणी करुन १८३ कोटी रुपये कर भरणा नोटीस दिली होती. आयकर विभागाने मागील दोन वर्षाचे दक्षिणापेटीतील दानावर आयकर आकारणी केली नव्हती. तथापी, सदर निर्णयास अनुसरुन मागील दोन वर्षाच्या दक्षिणापेटील दानावर सुध्दा आयकर आकारणीचा निर्णय घेतला व संस्थानला आयकर आकारणीच्या नोटीसा दिल्या. संस्थानमार्फत मा.उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायलयात रिट अर्ज दाखल करण्यात आले होते. मा.उच्च न्यायलय व मा.सर्वोच्च न्यायालयाने आयकर अपीलामध्ये कर निश्चित होईपर्यंत देय करास स्थगिती आदेश दिला होता. संस्थानमार्फत आयकर अपील दाखल करण्यात आले व आयकर विभागाने अंतीमतः श्री साईबाबा संस्थानला धार्मिक व धर्मदाय ट्रस्ट असल्याचे मान्य करुन दक्षिणापेटीतील दानावर आकारणी करण्यात आलेल्या करात सुट दिली. अशा प्रकारे मागील तीन वर्षात आकारणी करण्यात आलेल्या १७५ कोटी रुपये आयकरात श्री साईबाबा संस्थानला सुट मिळाली आहे.

          याकरीता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व मा.व्यवस्थापन समितीचे नियोजनाने मा.उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीचे वरिष्ठ वकील सीए श्री.एस.गणेश यांनी संस्थानची बाजू मांडली. तसेच याकामी आयकर विभागातील निवृत्त प्रिन्सिपल श्री.एस.डी.श्रीवास्तव, माजी विश्वस्त अॅड.मोहन जयकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Undefined
श्री साईबाबा संस्‍थानला आयकरात १७५ कोटी रुपये कर माफी
Friday, November 25, 2022 - 15:45