Languages

   Download App

    श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने ०१ मे २०२२ रोजी सकाळी ०७.१० वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्यावर संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्ते ध्वजारोहन

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने ०१ मे २०२२ रोजी सकाळी ०७.१० वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्यावर संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्ते ध्वजारोहन, आदर्श कर्मचारी व सेवा निवृत्‍त कर्मचा-यांचा सत्‍कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, शैक्षणिक संकुलाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी संस्‍थानच्‍या अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्‍छा देवुन कोरोना काळात कर्मचा-यांनी केलेल्‍या कार्याबद्दल सर्व कर्मचा-यांचे कौतुक ही केले. तसेच यावेळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त सचिन गुजर यांनी ही संस्‍थानचे अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्‍छा दिल्‍या. ०१ मे या कामगार दिनाच्या औचित्यावर श्री साईबाबा संस्थानच्या सामान्‍य प्रशासनाचे लिपीक टंकलेखक बबन भडांगे, संरक्षण विभागाचे मदतनीस पाराजी पोकळे, मदत‍नीस परमेश्‍वर गोसावी, संस्‍थान कंत्राटी मधुकर होन, संस्‍थान कंत्राटी संदिप भवर, संस्‍थान कंत्राटी बापुसाहेब शेळके, कंत्राटी सुरक्षा कर्मचारी संतोष गुजर, श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थानच्‍या मदत‍नीस श्रीमती सुरेखा ठाकुर, मंदिर विभागाचे मदत‍नीस अंबादास गोंदकर, कॅन्‍टीन विभागाचे मदत‍नीस दत्‍तु सुलाखे, फायर अॅण्‍ड सेफ्टी विभागाचे कंत्राटी कर्मचारी वाल्‍मीक गमे, मालमत्‍ता विभागाचे कंत्राटी कर्मचारी महादेव डावखर, कन्‍या विद्या मंदिरच्‍या लिपीक टंकलेखक श्रीमती इंदुमती शिवदे, बांधकाम विभागाचे मदतनीस विलास राऊत, विद्युत विभागाचे तारतंत्री संतोष देवकर, आरोग्‍य विभागाचे मदतनीस उत्‍तम चाबुकस्‍वार, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे निदेशक प्रशांत परदेशी, मेकॅनिकल विभागाचे वेल्‍डर चंद्रभान गोर्डे, वाहन विभागाचे वाहन चालक मुकुंद थोरात, श्री साईप्रसादालयाच्‍या स्‍त्री मदतनीस श्रीमती इंदुबाई निबांळकर, मदतनीस जनार्दन थोरात, लेखाशाखाचे लिपीक टंकलेखक दत्‍तात्रय शिंदे, श्री साईनाथ रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम तांबे, सफाई कामगार परशुराम साळवे, कंत्राटी परिचारक रियाज शेख, पाणी पुरवठा विभागाचे मदतनीस मच्छिंद्र तांदळे, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बागडे, परिचारिका श्रीमती वैशाली सुर्वे व लाडू प्रसाद निर्म‍िती विभागाचे जयराम कांदळकर अशा २९ कर्मचा-यांचा आदर्श कर्मचारी म्हणून संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व विश्‍वस्‍त सचिन गुजर यांच्‍या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र, श्रींची प्रतिमा, शॉल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या आस्‍थापनेवरील माहे एप्रिल -२०२२ मध्‍ये विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवुन सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांचा संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व विश्‍वस्‍त सचिन गुजर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यामध्‍ये संरक्षण विभागाच्‍या श्रीमती विमल बच्‍छे, श्री साईबाबा हॉस्पिटलच्‍या श्रीमती सुजाता जोशी, कॅन्‍टीन विभागाचे माधव इनामके, इंग्लिश मिडीयम स्‍कुलचे प्रमोद खरात, आरोग्‍य विभागाचे हरिभाऊ बचणे, प्रसादालय विभागाचे अशोक दिवेकर व पंढरीनाथ पवार या कर्मचा-यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरचे अध्‍यापक वसंत वाणी यांनी केले.
Undefined
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने ०१ मे २०२२ रोजी सकाळी ०७.१० वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्यावर संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्ते ध्वजारोहन
Monday, May 2, 2022 - 10:15
Donation Live Darshan