Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव 2023

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव 2023

शिर्डी –

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्मीपुजन उत्सव साजरा करण्यात आला असून श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योती हुलवळे यांच्या हस्ते लक्ष्मी कुबेर पुजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्मीपुजन उत्सव साजरा करण्यात आला. दिपावलीनिमित्त आज सायंकाळी ०५.०० ते ०६.०० यावेळेत समाधी मंदिराच्या गाभा-यात संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योती हुलवळे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले. याप्रसंगी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, सौ.मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, लेखाधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात आली. तर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली.

दिपावली उत्सवानिमित्त भुवनेश्वर येथील साईभक्त श्री सदाशिव दास श्री साईकृपा चॅरीटेबल ट्रस्ट, यांच्या वतीने देणगीस्वरुपात विद्युत रोषणाई व आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्त श्रीमती. पी. श्रीशक्ती यांच्या देणगीतुन श्री साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच आंध्रप्रदेश येथील देणगीदार साईभक्त श्री.एम. श्रीनिवास राव यांनी मेडीकल फंडासाठी १२ लाख रुपये देणगीचा डी.डी. संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपुर्त केला.

 

Undefined
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव 2023
Monday, November 13, 2023 - 10:15