Languages

   Download App

सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु (कोविड-१९) ची साथ परत एकदा वाढत असुन सदरच्या विषाणुचा प्रार्दुभाव वाढत चाललेला आहे. सदर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी श्री साईनाथ रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करावयाचे आहे

सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु (कोविड-१९) ची साथ परत

शिर्डी -

सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु (कोविड-१९) ची साथ परत एकदा वाढत असुन सदरच्या विषाणुचा प्रार्दुभाव वाढत चाललेला आहे. सदर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी श्री साईनाथ रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करावयाचे आहे.  सदर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठयाप्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते.

त्यासाठी मे.रिलायन्स फाऊंडेशन यांनी श्री साईबाबा संस्थान संचलीत श्री साईनाथ रुग्णालयासाठी हवेतून प्रतिमिनीटाला १२०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारे मे.ॲटलस कॉपको इंडीया, पुणे याकंपनीचा ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट हा देणगी स्वरुपात दिला आहे. सदर प्लॅन्टची उभारणी कंपनी इंजिनीअर्स व्दारे दिनांक ३० एप्रिल २०२१ ते दिनांक ३० मे २०२१ या एक महिन्याच्या कालावधीत करण्यात आली. सदर प्लॅन्टव्दारे निर्माण होणारा ऑक्सिजन वायू ९३% शुध्दतेचा आहे. सदर ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट करीता मे.रिलायन्स फाऊंडेशन, मुंबई यांचे पुरवठा आदेशानुसार एकूण रुपये १ कोटी ८८ लाख ८० हजार इतका खर्च झालेला आहे.

सदर प्लॅन्टव्दारे श्री साईनाथ रुग्णालयातील अंदाजे २५० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल. तसेच सदर ऑक्सिजन प्लॅन्टला कोणत्याही स्वरुपाच्या कच्च्या मालाची आवश्यकता  नाही.

सदर प्लॅन्टचे उदघाटन मा.मुख्यमंत्री साहेबांचे हस्ते दिनांक १८ मे २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने झाले. तेंव्हापासून आजपावेतो सदर प्लॅन्ट समाधानकारकरित्या कार्यरत आहे. गरजेनुसार सदर O2 Plant व्दारे रुग्णांना त्याची (ऑक्सिजनची) सुविधा देण्यास सज्ज आहे.

Undefined
सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु (कोविड-१९) ची साथ परत एकदा वाढत असुन सदरच्या विषाणुचा प्रार्दुभाव वाढत चाललेला आहे. सदर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी श्री साईनाथ रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करावयाचे आहे
Tuesday, July 6, 2021 - 18:00