Languages

  Download App

साईबाबांच्या चरणी 17 लाखांचा सुवर्ण मुकुट

साईबाबांच्या चरणी 17 लाखांचा सुवर्ण मुकुट

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक २६ सप्‍टेंबर २०२४ रोजी नलगोंडा, तेलंगाणा येथील श्रीमती सी. एच. भाग्‍यलक्ष्‍मी या साईभक्ताने साईचरणी २५८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या मुकूटाची किंमत १७ लाख ७३ हजार ७५० रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Undefined
साईबाबांच्या चरणी 17 लाखांचा सुवर्ण मुकुट
Thursday, September 26, 2024 - 14:30