Languages

  Download App

साईबाबांना अर्पण झाला ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट.

साईबाबांना अर्पण झाला ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने साईचरणी ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या मुकूटाची किंमत अंदाजे १२ लाख ७० हजार रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण हिरे जडीत मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्‍यात आला. साईबाबांच्या चरणी अर्पण करण्‍यात आलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्‍ताने संस्थानला आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

Undefined
साईबाबांना अर्पण झाला ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट.
Sunday, September 22, 2024 - 15:30