Languages

   Download App

शिर्डी येथे येणा-या साईभक्‍तांनी श्री साईबाबा संस्‍थानमधील देणगी कक्ष किंवा इतर ठिकाणी रु.२००० च्‍या चलनी नोटा स्विकारल्‍या जाणार नसलेबाबत

शिर्डी येथे येणा-या साईभक्‍तांनी श्री साईबाबा संस्‍थानमधील देणगी कक्ष किंवा

शिर्डी –

शिर्डी येथे येणा-या साईभक्तांनी श्री साईबाबा संस्थानमधील देणगी कक्ष किंवा इतर ठिकाणी रु.२००० च्या चलनी नोटा स्विकारल्या जाणार नसलेबाबत, तसेच श्री साईभक्तांनी रु.२००० च्या चलनी नोटा दक्षिणा पेटयांमध्येही टाकू नयेत असे अवाहन श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवळे यांनी केले आहे. 

            श्री. हुलवळे म्हणाले, शिर्डी येथे देश विदेशातून साईभक्त श्रींचे दर्शनासाठी येत असतात. दर्शन झाल्यानंतर साईभक्त देणगी कक्षात जाऊन संस्थानला देणगी देत असतात. तसेच मंदीर व मंदीर परिसरात विविध ठिकाणी बसविण्यात आालेल्या दक्षिणापेटयांमध्ये गुप्त स्वरुपात दान देत असतात. यामध्ये रु.२०००/- मूल्याच्या नोटांचाही समावेश असतो.  

 तथापि, रिझर्व बॅंक ऑफ इंडिया, मुंबई यांचेकडील दि.१९ मे २०२३ रोजीचे परिपत्रकानुसार  भारतीय चलनातील रु.२००० च्या चलनी नोटा दि.३० सप्टेंबर २०२३ नंतर बॅकेत जमा करता येणार नाहीत. यासअनुसरुन,  

शिर्डी येथे येणा-या सर्व साईभक्तांना श्री साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने विनम्र आवाहन करण्यात येते की, दि.३० सप्टेंबर, २०२३ नंतर संस्थानमधील देणगी कक्ष किंवा इतर ठिकाणी रु.२००० च्या चलनी नोटा स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच श्री साईभक्तांनी रु.२००० च्या चलनी नोटा दक्षिणा पेटयांमध्येही टाकू नयेत. असे अवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Undefined
शिर्डी येथे येणा-या साईभक्‍तांनी श्री साईबाबा संस्‍थानमधील देणगी कक्ष किंवा इतर ठिकाणी रु.२००० च्‍या चलनी नोटा स्विकारल्‍या जाणार नसलेबाबत
Monday, October 2, 2023 - 10:15