Languages

   Download App

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने

जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिर्डी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी यांच्या वतीने आयोजित केलेला जागतिक महिला दिन कार्यक्रम संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकार यार्लगड्डा यांच्या सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला.

दिनांक ०८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक १२ मार्च २०२३ रोजी श्री साईप्रसादालयाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष स्थान संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ.कावेरी जाधव यांनी भुषविले. तर या कार्यक्रमास ॲड. सौ.रंजना गवांदे, साहित्यकार सौ.निलीमा क्षत्रीय, कळसुबाई मिलेट फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी अकोले व नाशिकच्या अध्यक्षा सौ.निलीमा जोरवर, सौ.चंद्रकला खराडे, डॉ.मैथिली पितांबरे, डॉ.उज्वला शिरसाठ, श्री साईबाबा इंग्लिश मेडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा पुजारी, रुग्णालयाच्या परिचारिका सौ.मंदा थोरात, सौ.नजमा सय्यद, सौ.श्रद्धा कोते व संस्थानच्या विविध विभागातील महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

या प्रसंगी अॅड.सौ.रंजना गवांदे यांनी समाजात महिला संदर्भात असणारे कायदे विषयक माहिती सांगत सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई तसेच आनंदीबाई जोशी यांची उदाहरण देत महिलांना सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले. तर साहित्यकार सौ.निलीमा क्षत्रीय यांनी आपल्या हास्य-व्यंग्यात्मक शैलीमध्ये घरगुती उदाहरण देत महिलांच्या मनाचा ठाव घेतला. त्याचप्रमाणे सौ.निलीमा जोरवर यांनी महिलांना भरडधान्याचे जीवनातील अमुलाग्र महत्व पटवुन देत आरोग्य उत्तम राखण्याचे धडे दिले. याबरोबरच डॉ.मैथिली पितांबरे व डॉ.उज्वला शिरसाठ यांनी महिलांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.शिल्पा पुजारी, सौ.मंदा थोरात, सौ.नजमा सय्यद व सौ.श्रद्धा कोते यांनी  केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.शिल्पा पुजारी व सुत्रसंचालन प्रा.सौ. सोनाली हरदास यांनी केले. तर आभार सौ.श्रद्धा कोते यांनी मानले.

सदर महिला दिन कार्यक्रम हा श्री साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, कैलास खराडे व संजय जोरी यांच्या संकल्पनेतुन व विशेष सहकार्याने साजरा झाला.

Undefined
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
Tuesday, March 14, 2023 - 17:30