Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवुन शिर्डी शहरात व साईमंदीर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने चालू वर्षाला निरोप व

शिर्डी - 

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवुन शिर्डी शहरात व साईमंदीर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला असून याकरीता अतिरिक्‍त पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्‍यात आलेले आहेत.

दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी व कोरोना विषाणुचा वाढत्‍या प्रादुर्भावामुळे राज्‍य शासनाच्‍या दि.२४ डिसेंबर २०२१ चे आदेशानुसार रात्रौ.०९.०० ते सकाळी ०६.०० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्‍यात आलेले आहे. तसेच दि.३१ डिसेंबर रोजी रात्रौ साईभक्‍तांची व ग्रामस्‍थांची मोठया प्रमाणात गर्दी होण्‍याची शक्‍यता असल्‍याने संस्‍थानच्‍या वतीने भाविकांना ध्‍वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच रात्रौ ०९.०० वाजेनंतर श्री साईबाबा मंदीरातील आतील बाजु व मंदिर गाभारा यामध्‍ये साईभक्‍तांना प्रवेश दिला जाणार नाही. संस्‍थानच्‍या संरक्षण विभागामार्फत मंदिराचे सर्व प्रवेशव्‍दार या ठिकाणी संरक्षण अधिकारी यांनी सुरक्षा अधिकारी, सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षा रक्षकामार्फत परिसरात पेट्रोलींग व महाद्वार या ठिकाणी जमाव होणार नाही, त्‍याकामी बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला आहे.

          तसेच संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेशी मंदीर बंदोबस्‍तकामी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मागणी करण्‍यात आलेली होती. त्‍याप्रमाणे  पोलीस विभागामार्फत बाहेरील पो.स्‍टे.चे २४ अधिकारी व ३१० पोलीस अंमलदार (महिला ६० व २५० पुरुष) शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे नियंत्रणाखाली बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला आहे. शिर्डी पोलीस स्‍टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व शहरवाहतुक शाखेचे ट्रॅफीक पोलीस यांच्‍यासह शिर्डी शहरात व मंदीर परिसरात लोकांचा जमाव होणार नाही, याबाबत दक्षता ठेवलेली असुन भाविकांनी व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह परिसर, चावडी समोरील परिसर व मंदिर प्रवेशव्‍दार आदी ठिकाणी गर्दी करुन नये. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आलेले आहे.

Undefined
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवुन शिर्डी शहरात व साईमंदीर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात
Friday, December 31, 2021 - 10:15
Donation