Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीव्‍दारे संचालित रुग्‍णालयाच्‍या वतीने शासनाच्‍या आदेशान्‍वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना साई धर्मशाळा येथे कोरोना लसीकरण सुरु करण्‍यात आले असल्‍याची माहिती

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीव्‍दारे संचालित रुग्‍णालयाच्‍या वतीने शासनाच्‍या आदेशान्‍वये

शिर्डी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीव्‍दारे संचालित रुग्‍णालयाच्‍या वतीने शासनाच्‍या आदेशान्‍वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना साई धर्मशाळा येथे कोरोना लसीकरण सुरु करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने श्री साईधर्मशाळा भक्‍तनिवास येथील इमारतीतील तळ मजल्‍यावर ०८ हॉलमध्‍ये प्रत्‍येकी १० ते १२ खाटांचे असे एकुण १०० खाटांचे विलगीकरण केंद्र व कोव्‍हीड हॉस्पिटलची उभारण्‍यात आले होते. तसेच रुग्‍णालयाच्‍या अखत्‍यारीत कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाचे निर्देशाप्रमाणे CCC, DCHC व DCH चालविण्‍यात आले. त्‍याव्‍दारे १८ मार्च २०२० पासून कोरोनाचे लक्षण असलेले रुग्‍ण व लक्षण रहित सुमारे १० हजार इतक्‍या रुग्‍णांवर मोफत उपचार करण्‍यात आलेले आहेत. कोरोनाच्‍या रुग्‍णांकरीता आक्सिजनची कमतरता लक्षात घेवुन देणगीदार साईभक्‍तांच्‍या ०२ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपये देणगीतुन हवेतुन ऑक्सिजन निर्मिती करणारा १२०० (LPM Liter Per Minute) लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन निर्म‍िती प्रकल्‍प आणि संस्‍थानच्‍या वतीने दररोज ०३ शिफ्टमध्‍ये सुमारे १३०० चाचण्‍या घेण्‍याची क्षमता असलेली आरटी-पीसीआर लॅब उभारण्‍यात आलेली असून याव्‍दारे सुमारे ८५ हजार इतक्‍या चाचण्‍या मोफत घेण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच रुणालयामार्फत शिर्डी व परिसरातील २३ हजार जणांना प्रथम आणि व्दितीय लसीकरण करण्‍याचे महत्‍वपुर्ण काम करण्‍यात आले व ते आजतागायत सुरु आहे.

तसेच नव्‍याने प्रति दिवस ५ हजार व्‍यक्‍तींपर्यंत आरटी-पीसीआर तपासणी क्षमता वाढविणे, जीनोम सीक्‍वेसिंग लॅब उभारणी करणे, दोन लिक्‍वीड मेडीकल ऑक्‍सीजन प्‍लॅट भाडेतत्‍वावर घेणे, साईआश्रम फेज २ येथे कोव्‍हीड रूग्‍णांकरीता सुमारे ३०० खाटांचे ऑक्‍सीजन बेड वाढविणे, दोन लिक्‍वीड ऑक्‍सीजन प्‍लॅंट व व्‍हेंटीलेटर तसेच वैद्यकीय साहीत्‍य व आवश्‍यक पायाभूत सुविधा देणगी स्‍वरूपात उपलब्‍ध करणे, अशा विविध सुविधा संस्‍थानच्‍या वतीने उपलब्‍ध करण्‍याकरीता प्रयत्‍न करण्‍यात येत आहे.

 

याबरोबरच कोरोना व्‍हायरसच्‍या संभाव्‍य लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर शासनाच्‍या आदेशान्‍वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लसीकरण संस्‍थानच्‍या रुग्‍णालयामार्फत मोफत करण्‍यात येत आहे. हे लस साईआश्रम फेज ०२ (साई धर्मशाळा) येथे सकाळी १०.०० ते सायं.०५.०० यावेळेत उपलब्‍ध असणार असल्‍याचे सांगुन जास्‍तीत-जास्‍त नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले. 

Undefined
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीव्‍दारे संचालित रुग्‍णालयाच्‍या वतीने शासनाच्‍या आदेशान्‍वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना साई धर्मशाळा येथे कोरोना लसीकरण सुरु करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती
Tuesday, January 4, 2022 - 10:15
Donation