Languages

   Download App

श्री रामनवमी प्रथम दिवस फोटो (PRO- SSST, SHIRDI)

श्री रामनवमी प्रथम दिवस फोटो (PRO- SSST, SHIRDI)

फोटो नंबर ०१) श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेवुन सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, सौ.मिनाक्षी सालीमठ, सौ.कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

फोटो नंबर ०२) श्री रामनवमी उत्सवानिमित्त व्दारकामाई मंदिरात अखंड पारायणास सुरवात करण्यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मिनाक्षी सालीमठ. 

 

फोटो नंबर ०३) श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मिनाक्षी सालीमठ यांच्या हस्ते पाद्यपुजा करण्यात आली. यावेळी प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व सौ.कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

 

फोटो नंबर ०४) श्री रामनवमी उत्सवानिमित्त व्दारकामाई मंडळ, मुंबई यांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर मंदिर प्रवेशव्दारावर श्रीराम, लेंडीबागेत साई पालखी मिरवणुक व श्री साईप्रसादालयाच्या प्रवेशव्दारावर शिव भोला भंडरी..साई भोला भंडारी हे भव्य देखावे उभारले आहे.

 

Undefined
श्री रामनवमी प्रथम दिवस फोटो (PRO- SSST, SHIRDI)
Wednesday, March 29, 2023 - 14:30