Languages

  Download App

श्री साईबाबा संस्थानला TVS MAX EV इलेक्ट्रिक रिक्षा देणगी

श्री साईबाबा संस्थानला TVS MAX EV इलेक्ट्रिक रिक्षा देणगी

श्री साईबाबा संस्थानला TVS कंपनीकडून TVS MAX EV इलेक्‍ट्रीक रिक्षा देणगी
शिर्डी, दि. ०५ मार्च २०२५ : श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्या सेवेत अधिक सुविधा पुरविण्‍याच्या उद्देशाने TVS कंपनीच्या वतीने TVS MAX EV ही ३ चाकी इलेक्‍ट्रीक रिक्षा देणगी स्‍वरुपात प्रदान करण्यात आली. संस्थानच्‍या वतीने वाहनाची विधीवत पूजा करून टि.व्‍ही.एस. मोटर्सचे CEO के. एन. राधाकृष्णन यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे वाहनाची चावी सुपुर्द केली.
यानंतर, संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री के. एन. राधाकृष्णन यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला TVS कंपनीचे सेल्स रिजनल मॅनेजर मनप्रित सिंग छाब्रा, सर्व्हिस रिजनल मॅनेजर सौरव घोराई, एरिआ मॅनेजर आशिष जैसवाल तसेच संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे यापूर्वीही TVS कंपनीने श्री साईबाबा संस्थानला ११ दुचाकी आणि २ तीन चाकी वाहने देणगी स्वरूपात प्रदान केली आहेत. संस्थानकडून या सहकार्याबद्दल TVS कंपनीचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Undefined
श्री साईबाबा संस्थानला TVS MAX EV इलेक्ट्रिक रिक्षा देणगी
Wednesday, March 5, 2025 - 15:30