Languages

   Download App

Daily Ritual

Daily Ritual

Daily Ritual /Worship

Shri Sai Satyavrat Pooja

Slot : Batch I (07:00-08:00) ,Batch II (09:00-10:00)

Description : Pooja services can be accessed either through online or offline.

Abhishek Pooja

Slot : Batch I (07:00-08:00) ,Batch II (09:00-10:00)

Description : Pooja services can be accessed either through online or offline.

Vehicle Pooja

Slot : Batch I (07:00-08:00) ,Batch II (09:00-10:00)

Description : Pooja services can be accessed through offline.

श्रीसाई सच्चरितातील अध्याय क्र.१३ मध्ये उल्लेखानुसार नारायणगावचे भीमाजी पाटील, क्षयरोगाने त्रस्त झाले होते. त्यांनी सर्व औषधोपचार, देवधर्म केले परंतु, त्यांना आजारापासुन सुटका झाली नाही. शेवटी नानासाहेब चांदोरकर यांच्या सांगण्यावरुन श्रीसाईबाबांना शरण आले. त्यानंतर श्रीसाईबाबांच्या कृपा आशिर्वादाने त्यांचा रोग बरा झाला. भिमाजी पाटील श्रीनारायण (भगवान विष्णू) यांचे भक्त होते. साईबाबांनी त्यांचा आजार बरा केल्यावर त्यांनी बाबा हे परब्रह्म श्रीनारायणाचे अवतार आहेत असे जाणून बाबांची सत्यनारायण म्हणून पूजा करण्याची नवीन परंपरा सुरू केली. अशा प्रकारे श्रीसाईसत्यव्रत पूजेचा उगम झाला आहे. आता साईभक्तांची मनोकामना पुर्ण व्हावी यासाठी सत्यनारायण पूजेमध्ये श्रीसाईबाबांच्या मुर्तीची पूजा करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या संस्थान पुजारी यांचेमार्फत श्रीसत्यनारायण पूजेच्या शेवटच्या अध्यायानंतर भिमाजी पाटील यांचे संक्षिप्त स्वरुपात माहिती देतात.

  • पूजेचे ठिकाण:- शनि मंदिराचे मागील श्रीसाईसत्यव्रत हॉल.
  • पुजेची नोंदणी:- १) संस्थानचे संकेतस्थळावरुन Online पद्धतीने किंवा २) संस्थानचे देणगी कार्यालयातून Offline पद्धतीने एक दिवस अगोदर (पुजेचे तिकीट पूजेच्या पुर्वी सादर करणे अनिवार्य आहे.)
  • पुजेच्या तिकीटाची किंमत:- रु.१००/-
  • पुजेची वेळ:- १) सकाळी ७:०० ते सकाळी ८:०० पहिली बॅच. २) सकाळी ९:०० ते सकाळी १०:०० दुसरी बॅच. ३) सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० वाजता तिसरी बॅच.
  • पुजेकरिता यजमान:- एक तिकीटावर जोडप्यास (पती-पत्नी) किंवा एका व्यक्तीस पूजेला बसता येईल.
  • पुजेचे साहित्य :- पूजेकरिता यजमानास कोणतेही साहित्य आणावे लागत नाही. पूजेचे साहित्य संस्थानमार्फत

पुरविण्यात येते. तसेच पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून शिराप्रसाद व एक श्रीफळ प्रत्येकाला संस्थानमार्फत देण्यात येते

पुर्वीपासुन शिर्डी येथे श्रींचे दर्शनासाठी येणा-या साईभक्तांकरिता अभिषेक पूजा करण्याची सुविधा साईभक्तांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. साईभक्तांच्या इच्छा व मनोकामना पुर्ण व्हाव्या याकरिता श्रींचे पंचधातूच्या मूर्तीस अभिषेक करण्यात येतो.

  • पूजेचे ठिकाण:- मुखदर्शन हॉल
  • पुजेची नोंदणी:- १) संस्थानचे संकेतस्थळावरुन Online पद्धतीने किंवा २) संस्थानचे देणगी कार्यालयातून Offline पद्धतीने एक दिवस अगोदर (पुजेचे तिकीट पूजेच्या पुर्वी सादर करणे अनिवार्य आहे.)
  • पुजेच्या तिकीटाची किंमत:- रु.१०१/-
  • पुजेची वेळ:- १) सकाळी ७:०० ते सकाळी ८:०० पहिली बॅच. २) सकाळी ९:०० ते सकाळी १०:०० दुसरी बॅच.
  • पुजेकरिता यजमान:- एक तिकीटावर जोडप्यास (पती-पत्नी) किंवा एका व्यक्तीस पूजेला बसता येईल.
  • पुजेचे साहित्य :- पूजेकरिता यजमानास कोणतेही साहित्य आणावे लागत नाही. पूजेचे साहित्य संस्थानमार्फत

पुरविण्यात येते. तसेच पूजा झाल्यानंतर संस्थानमार्फत प्रसाद म्हणून एक लाडू पाकीट व एक श्रीफळ प्रत्येकाला देण्यात येते.

संस्थानमार्फत करण्यात येणा-या दैनंदिन पूजेची माहिती 

  वेळ कार्यक्रम
  पहाटे ४:४५ वा समाधी मंदिर उघडते.
  पहाटे ५:०० वा. भुपाळी रेकॉर्ड.
  पहाटे ५:१५ वा. श्रींची “काकड आरती” सुरु होते.
  काकड आरतीनंतर श्रींचे मंगलस्नान सुरु होते
  सकाळी ०६:३० वा. श्रींची “शिर्डी माझे पंढरपुर” आरती सुरु होते.
  शिर्डी माझे पंढरपूर आरतीनंतर श्रींचे दर्शनास प्रारंभ होतो
  सकाळी ७:०० वा. श्रीसाईबाबांचे समाधीस अभिषेक सुरु होते
  सकाळी ७ ते ८, ९ ते १० व ११ ते १२ सत्यनारायण हॉल येथे साईभक्तांकरिता श्रीसाईसत्यव्रत पूजा करण्यात येतात.
  सकाळी ७ ते ८ व ९ ते १० साईभक्तांकरिता समाधी मंदिराचे समोरील मुखदर्शन हॉल येथे अभिषेक पूजा करण्यात येतात.
  दुपारी १२:०० वा. श्रींची “माध्यान्ह आरती” सुरु होते
  माध्यान्ह आरतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरू होते.
  सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी श्रींची “धूपारती” सुरु होते. (सुर्यास्ताचे वेळेनुसार धूपारतीचे वेळेत बदल होतो.)
  धूपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरू होते.
  रात्रौ ८:३० ते ९:३० समाधी मंदिराचे समोरील स्टेजवर साईभक्तांमार्फत कलाकार हजेरी कार्यक्रम सेवाभावी करणेत येतो.
  रात्रौ १०:०० श्रींची “शेजारती” होते.
  शेजारतीनंतर समाधी मंदिरातील उपस्थित साईभक्त दुरुन दर्शन घेऊन बाहेर जातात.
  रात्रौ ११:०० चे दरम्यान श्रींचे समाधी मंदिर बंद होते.