Languages

   Download App

Shree Saibaba Sansthan, Shirdi – New Initiatives

Shree Saibaba Sansthan, Shirdi – New Initiatives

New Initiatives by Shree SaiBaba Sansthan Trust, Shirdi

  Initiative Marathi Title View
Paid Darshan Pass Kiosk System सशुल्क पास करिता किऑस्क सिस्टीम Details
दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी श्री रामनवमी उत्‍सवाचे औचित्‍यावर श्री साईभक्‍तांचे सुविधेकरीता प्रवेशद्वार क्र १ चे जवळ सशुल्‍क दर्शन पास KIOSK चे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यंच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या श्री साई भक्तांना दर्शन सुलभरीतीने व्हावे याकरिता सशुल्क दर्शन पासची व्यवस्था सर्व भक्तनिवासस्थान येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बस स्टॅन्ड येथेही अतिरिक्त काउंटर उघडण्यात आलेले आहे. श्री साईभक्तांना आपल्या सोयीनुसार पास काढण्याची व त्याकरिता डिजिटल पेमेंटची व्यवस्था कीऑस्क द्वारे करण्यात आलेली आहे.
सेल्फ सर्विस कीऑस्क (Kiosk) व डिजिटल पेमेंटची व्यवस्था सर्व भक्तनिवासस्थान तसेच गेट नंबर सहा येथील पीआरओ कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे. श्री साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गेट नंबर एक येथे 4 कीऑस्कची (Kiosk) व्यवस्था करण्यात आलेली आहे, सदरच्या सेवेस भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून भक्तांनी याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.
On April 6, 2025, coinciding with the Shri Ram Navami festival, a Paid Darshan Pass Kiosk was inaugurated near Entry Gate No. 1 for the convenience of Sai devotees. The inauguration was done by the Chief Executive Officer, Goraksha Gadilkar(IAS). This kiosk system enables devotees to obtain paid darshan passes easily, with digital payment options.
Self Service kiosk system available at all Accommodation locations. Self-service kiosks and digital payment facilities have been setup at the PRO office near Gate No 6. Looking at the overwhelming response, four kiosks have been installed at Gate No. 1. Devotees have expressed great satisfaction with this service.
Paid Darshan Pass Kiosk System
Online Sai Sevak Registration System साईसेवक नोंदणी करणेसाठीची ऑनलाईन प्रणाली Details
श्री साईबाबा संस्थान मध्ये मोफत सेवा देऊ इच्छिणारे साई भक्तांसाठी साई सेवक ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. साई सेवक म्हणून नोंद करणाऱ्या साई भक्तांच्या समूहाला सात दिवस सेवा करण्याची संधी दिली जाते. साई सेवकांसाठी असलेले रजिस्ट्रेशन ऑनलाइन करण्यात आलेले आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वेब पोर्टलद्वारे इच्छुक साईभक्त सेवेसाठी आपला अर्ज करू शकता (https://online.sai.org.in). साई सेवकांसाठी ऑनलाईन नोंदणी सेवा सुरू साई भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
The Sansthan has launched an online registration system for devotees wishing to offer voluntary service as Sai Sevak. Groups of registered Sai sevak get seven-day opportunity to serve in various department of Trust. Interested devotees can apply through the Sansthan official website https://online.sai.org.in. The commencement of online registration has been well received by devotees.
Gate Pass Facility at Gate No. 4 for Temple Premises गेट नंबर चार येथे मंदिर परिसर प्रवेश पासची सोय Details
श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरामध्ये असलेले श्री शनेश्वर मंदिर, श्री गणेश मंदिर व श्री महादेव मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या गावकऱ्यांकरीता तसेच ध्यान मंदिर येथे ध्यानसाधना व पारायण कक्ष येथे श्री साईचरित्र पारायण करिता येणारे श्री साईभक्तांना मंदिर परिसरात येण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे गेट नंबर चार येथे गावकऱ्यांसाठी, साईभक्तांसाठी व अभ्यंगतांसाठी मंदिर परिसर प्रवेश पासची सोय करण्यात आलेली आहे. या मुळे मंदिर परिसरामध्ये प्रवेश करणे सुलभ झालेले आहे. सदरच्या सुविधेचे गावकरी व साई भक्तांनी स्वागत केलेले आहे.
To facilitate villagers and devotees visiting the Shree Shanaishwar, Shree Ganesh, and Shree Mahadev temples within the Samadhi Mandir premises, as well as those coming for meditation, as a visitor in Admin Office, an entry pass system has been introduced at Gate No. 4. This has eased access to the temple premises, and the initiative has been warmly welcomed.
MHT-CET, NEET Coaching Classes MH-CET, NEET क्लासेस Details
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी हे केवळ अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देत आहे. संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांसाठी सक्षम बनविण्यासाठी, संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणि अनुभवी संस्था निवडण्याची प्रक्रिया संस्थानने सुरू केली आहे. ही संस्था किमान १० वर्षांचा अनुभव असलेली असावी तसेच त्यांच्या स्टाफमध्ये IITians/NITians यांचा समावेश असणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही प्राथमिक अट ठेवण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळू शकेल. विशेष म्हणजे, संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील १०वी इयत्तेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी कोचिंग क्लाससाठी पूर्णतः मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे होतकरू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची अडचण न येता उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच, जे विद्यार्थी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतील आणि १०वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवतील, त्यांच्यासाठी कोचिंग फी पैकी ५० टक्के रक्कम संस्थानतर्फे भरली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.
याचबरोबर, अनाथ विद्यार्थी आणि एकल मातांची मुले ज्यांनी १० वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असल्यास त्यांची एमएचटी-सीईटी कोचिंग संपूर्ण फी संस्थान मार्फत भरण्यात येणार आहे. 
श्री साईबाबा संस्थानचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी तसेच  इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. सदरचे वर्ग शिर्डी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी व परिसरा मधील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पालक वर्गातून सदर योजनेचे स्वागत करण्यात येत आहे.
Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi is not only making an active contribution in the spiritual but also in the social and educational fields. In order to make the aspiring students capable from SSST educational complex and Shirdi Village for future competitive entrance examinations. The Trust also provide smart digital learning classes and coaching facilities for the MHT-CET, NEET examination.
The Sansthan has started the process of selecting nationally renowned and experienced institutions. This is a primary condition for quality education, so that students can get quality guidance. Students who score more than 90 percent marks in class 10th of the Sansthan educational complex will be given completely free admission for the MHT-CET coaching classes. This will give the aspiring and intelligent students the opportunity to pursue higher education without any financial constraints. Also, for those students who take admission in Shri Saibaba Junior College and score less than 90 percent in 10th, 50% of the coaching fee will be paid by the Trust. This will provide an opportunity for good education to general meritorious students as well.
Along with this, the entire MHT-CET coaching fee of orphan students and children of single mothers who have scored more than 80 percent in 10th will be paid by the Trust.
This initiative of Shree Saibaba Sansthan Trust is a great opportunity for students from rural areas and economically weaker sections. Through quality and modern technology-based education, these students will be able to succeed in the entrance exams of engineering and other professional courses. It is being appealed to as many students as possible to take advantage of this facility. The said classes will be made available to students from rural areas like Shirdi at a nominal rate. Students in Shirdi and its vicinity will benefit from this. The said scheme is being welcomed by the parents.
Free German Language Classes जर्मन भाषा क्लासेस Details
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था असून या संस्थेमध्ये दरवर्षी 250 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. विविध ट्रेड मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस मध्येच विविध कंपन्या इंटरव्यू घेऊन समावून घेत आहेत. देशभरातील नामांकित कंपन्यांमध्ये श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी काम करत आहेत.
विद्यार्थ्यांनी परदेशी भाषा अवगत केल्यास त्यांना परदेशातही नोकरी मिळू शकते या या उद्दिष्टाने सदरच्या कॉलेजमध्ये जर्मन भाषा शिकवण्याचे क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत. या संस्थेतील ०२ प्रशिक्षणार्थ्यांची जर्मनी या देशात नोकरीसह दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झालेली असून त्यांना याकामी नियुक्तीपत्रे प्राप्त झालेली आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण १० प्रशिक्षणार्थ्यांची निवड झालेली असून यामध्ये संस्थानचे आयटीआय संस्थेतील चि. ओंकार राजेंद्र परभणे याची प्रशिक्षणार्थी मशिनिस्ट ग्राईडर तर चि. करण संजय शिंदे याची प्रशिक्षणार्थी फिटर या व्यवसायाचे कामासाठी निवड झालेली आहे.
या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार दिनांक १५/०५/२०२५ रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे शुभहस्ते करणेत आला. श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारे बरेचसे प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्यांना जर्मन देशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत असतांना याकामी जर्मन भाषा शिकण्यासाठी येणारा आर्थिक खर्च हा मोठ्या प्रमाणात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थ्यांना ते शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानने विनामुल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग संस्थेत सुरु केलेले असून याकामी जर्मन भाषा प्रशिक्षकाची नियुक्ती करणेत आलेली आहे.
याप्रसंगी बोलतांना श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी, संस्थेमध्ये पुढील काळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायात प्रवेश घेऊन संस्थेत सुरु असलेल्या विनामुल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा व परदेशात नोकरीची संधी घेऊन आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन केले. सदरच्या महाविद्यालयात अत्यंत नाममात्रा फी मध्ये विद्यार्थ्यांना विविध ट्रेड चे प्रशिक्षण दिले जाते. परदेशी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Shri Saibaba Sansthan Trust run Shri Saibaba Industrial Training Institute. This is a renowned institute in Maharashtra nearly 300 students pass out every year. Students who have passed in various trades are being interviewed by various companies in the college campus itself, and are being recruited. Students of Shri Saibaba Industrial Training Institute are working in renowned companies across the country.
With the aim of ensuring that students can get jobs abroad if they learn a foreign language, German language classes have been started in this college. 02 trainees from this institute have been selected for a dual degree course with a job in Germany and they have received appointment letters for this work. Shri Omkar R Parbhane, a trainee machinist grinder and Shri Karan S Shinde, a trainee fitter, have been selected for the profession. In Maharashtra, a total of 10 trainees have been selected and among them, the institute’s trainees from ITI, Shri Omkar R Parbhane (Machinist Grinder) and Shri Karan S Shinde (Fitter) have been selected. The felicitation of these trainees was done on 15/05/2025 by the Chief Executive Officer, Shri Goraksha Gadilkar, IAS. Most of the trainees at Shri Saibaba Industrial Training Institute are from rural areas and economically weaker sections. For such trainees, the cost of learning German language is a major constraint. Considering this, the Sansthan has started free German language classes in the institute and a German language trainer has been appointed. The CEO appealed that more students should join various trades at the institute and take advantage of the free German language classes for overseas job opportunities. The institute provides training in various trades at a nominal fee. Parents have expressed satisfaction with the start of foreign language training classes.
Free German Language Classes
Scholarship Classes स्कॉलरशिप क्लासेस Details
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलित श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. सदरच्या प्रशिक्षण वर्गामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये कुठेही मागे राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे. सदरच्या स्कॉलरशिप क्लासेस मुळे दोन्हीही शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करू लागले आहेत. त्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
Special coaching classes have been started for students of Shree Saibaba English Medium School and Shree Saibaba Kanya Vidya Mandir to prepare them for various scholarship exams. This ensures that students from rural backgrounds are not left behind in the competitive era, and the initiative has led to improved academic performance.
Wifi Enabled Campus and Digital Classrooms डिजिटल क्लासरूम व वायफाय युक्त कॅम्पस Details
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलित शाळा व कॉलेजसाठी एकत्रित असा भव्य शैक्षणिक संकुल बांधण्यात आलेला असून, सदरच्या शैक्षणिक संकुलामध्ये सुसज्ज थिएटर, स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, व विविध खेळांसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स व बॅचलर इन कॉम्प्युटर एप्लीकेशन हे कोर्सेस सुरू करण्यात आलेले असून सदरच्या विद्यार्थ्यांसाठी 120 संगणकाचा LAB कार्यान्वित करण्यात आलेला आहे. शैक्षणिक संकुलाचा संपूर्ण परिसर वाय-फाय युक्त करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.महाविद्यालयातील व शाळेतील वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत.
The Trust has developed educational complex with digital classrooms, Wi-Fi connectivity, a Modern theatre, Swimming pool, Badminton and Table Tennis courts, and Sports ground. In Shree Saibaba Senior college courses like B.Sc. Computer Science and Bachelor in Computer Applications have been started, with a 120 Computers lab operational for students.
Hospital Management System हॉस्पिटल साठी अद्यावत संगणक प्रणाली Details
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था मार्फत कार्यान्वित श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल व श्री साईनाथ चॅरिटेबल हॉस्पिटल येथे कार्यालयीन कामकाज तथा पेशंट ऍडमिनिस्ट्रेशन व वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यासाठी सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच नवीन उच्च क्षमतेचे सर्वर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सदरच्या संगणकीकरणामुळे प्रशासकीय गतिमानता व पेशंटसाठी सुलभता निर्माण होणार आहे सदरचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण क्षमतेने संपूर्ण हॉस्पिटल संगणीकृत होणार आहे.
Both Shree Saibaba Super Hospital and Shri Sainath Charitable Hospital have implemented advanced Hospital Management Software Systems for Administrative and Medical services, along with new high-capacity servers. This computerization will enhance efficiency and patient convenience, with full-scale implementation underway.
Sainath Eye Bank श्री साईनाथ नेत्रपेढी Details
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा दि १३ मार्च २०२५ रोजी संस्थांनच्या श्री  साईनाथ रुग्णालय (२०० रूम) येथे देणगीदार साई भक्त डॉ.कोंडा संगीता रेड्डी यांच्या हस्ते व श्री साईबाबा  संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब भा.प्र.से  व संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी  अधिकारी भिमराज  दराडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. संस्थांनच्या रुग्णालयात श्री साईबाबांच्या नावे  नेत्रपेढी सुरू व्हावी याकरिता संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाने नेत्र पिढी सुरू करण्यासंबंधीच्या सर्व मान्यता संस्थांन रुग्णालयाला प्रदान केल्या आहेत.   या नेत्रपेढीच्या माध्यमातून  अनेक दृष्टीहीनांना दृष्टी प्राप्त होणार असुन  त्याचबरोबर मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्या  जवळची सोय शिर्डी येथे निर्माण झाली आहे  त्‍यामुळे  याचा  लाभ शिर्डी व शिर्डी येथे मोठ्या  संख्येने येणाऱ्या गरजवंत  रुग्णांना होणार असुन त्‍यामुळे त्‍यांच्‍या जिवनाला  श्री साईबाबांचे  अशिर्वादाने कलाटणी भेटणार आहे. येथील सर्व  कर्मचारी यांनी श्री साईबाबांचा रुग्‍ण्‍सेवेचा वसा मोठया भक्‍तीभावाने जपला आहे. येथील कर्मचारी यांचे काम पाहुन मी भारावुन गेलेले आहे. असे प्रतिपादन उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलताना देणगीदार साईभक्‍त डॉ.कोंडा संगिता रेडडी यांनी केले.  नवीन आय बँकेच्या माध्यमातून भोकरदन येथील श्री. भगवान आनंद तळेकर यांचेवर साईनाथ रुग्‍णालयात यशस्‍वी नेत्र प्रत्‍यारोपन शस्‍त्रक्रिया करणेत आली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यांना स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे. या पूर्वी त्यांना एकाच डोळ्याने अंधुक दिसत होते, मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व आज डिस्चार्ज नंतर श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले. श्री. तळेकर हे गेल्या काही वर्षांपासून दृष्टीदोषाने त्रस्त होते. संस्थानच्या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर  सौदामिनी निघुते यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. उपचारानंतर प्रथमच स्पष्ट दृष्टी अनुभवल्याने त्यांच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्‍थानच्‍या दोन्‍ही रुग्‍णालयात रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि वैद्यकीय सेवा सातत्याने पुरवल्या जातात. अनेक रुग्णांना मोफत नेत्र उपचार आणि शस्त्रक्रिया केल्‍या जात आहेत.या यशस्वी उपचारामुळे रुग्णांना आनंद झाला आहे.
The inauguration ceremony of the Sainath Eye Bank, run by the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, was held on March 13, 2025 at the Shri Sainath Hospital (200 rooms) in the presence of donor Sai devotee Dr. Konda Sangita Reddy, Chief Executive Officer Shri Goraksha Gadilkar, IAS and Deputy Chief Executive Officer Shri Bhimraj Darade. The CEO had made special efforts for starting an eye bank in the name of Shri Saibaba in the hospital and today, all necessary approvals have been received from the Maharashtra government. Through this eye bank, many visually impaired people will get vision and the facility for eye donation has been created in Shirdi, which will benefit a large number of needy patients. The staff at the hospital are dedicated to patient care with great devotion. Dr. Konda Sangita Reddy, while speaking at the inauguration, expressed her happiness with the work of the staff. Through the new eye bank, a successful cornea transplant surgery was performed on Shri Bhagwan Anand Talekar from Bhokardan at Sainath Hospital. After the surgery, he could see clearly, which he could not do before. Shri Talekar had been suffering from vision problems for several years. The surgery was performed by the hospital’s expert Dr. Saudamini Nighute. Shri Talekar and his family were overjoyed as he could see clearly for the first time after treatment. Both hospitals under the Trust are providing modern treatment and medical services continuously for the well-being of patients. Many patients are getting free eye treatment and surgery, which has brought happiness to them.
Sainath Eye Bank
Press Room पत्रकार कक्ष Details
दि.१० एप्रिल २०२५ रोजी श्री साईबाबा संस्‍थानचे मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्‍ते “पत्रकार कक्ष” चे उद्धाटन करणेत आले. यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, पत्रकार बांधव तसेच संबंधीत विभागप्रमुख उपस्थित होते.
On April 10, 2025, the "Press Room" at Shree Saibaba Sansthan was inaugurated by the Chief Executive Officer, Goraksha Gadilkar, IAS. The event was attended by Deputy CEO Mr. Bhimraj Darade, members of the press, and heads of relevant departments. This dedicated facility will streamline media interactions and improve communication between the Trust and the press.
newsroom
Insurance cover of Rs. 5,00,000 for Shree Sai devotees साईबाबा के दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना पाच लाखांचे विमा कवच Details
श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन विविध खाजगी आणि सार्वजनिक वाहनांनी मोठ्या संख्येने भक्त येत असतात. साईभक्तांसाठी घरापासून निघून शिर्डीपर्यंत पोहोचेपर्यंत मार्गामध्ये कोणतीही अघटित घटना घडल्यास पाच लाखांचे विमा कवच संस्थानातर्फे जाहीर करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये विविध ठिकाणांहून पायी यात्रा करून साईबाबांची पालखी घेऊन येणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पायी प्रवास करताना येताना कोणतीही अघटित घटना घडल्यास अशा अपघातग्रस्त साईभक्त तसेच त्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु हा लाभ मिळण्यासाठी शिर्डीत येणाऱ्या पालखी मंडळाने आपल्या पालखी मंडळाचे नाव, पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे आधार क्रमांकासह अधिकृतरित्या संस्थानामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच खाजगी आणि सार्वजनिक वाहनांनी शिर्डीला येताना अघटित घटना घडल्यास अशा साईभक्तांनाही विमा कवचाचा लाभ मिळेल. परंतु या साईभक्तांनी श्री साईबाबा संस्थानातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा - ऑनलाइन भक्तनिवास, रूम बुकिंग, व्हीआयपी आरती पास, दर्शन पास, सत्यनारायण पास, अभिषेक पूजा पास यापैकी कोणत्याही सुविधेची आधीच नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी नोंदणी केलेल्या कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुष साईभक्तांना या योजनेचा लाभ मिळेल. शिर्डीला येताना मार्गात अघटित घटना घडल्यास त्या साईभक्तांच्या वारसांना या विमा योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम अपघात विमा म्हणून मिळणार आहे. सर्व साईभक्त आणि पालखी मंडळांनी या योजनेकडे लक्ष द्यावे असे आवाहन संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब यांनी केले आहे.
A large number of Shree Saibaba devotees come to Shirdi to have darshan of Shree Saibaba in various private, public vehicles and carrying palanquins. Shree Saibaba Sansthan Trust has announced an insurance cover of Rs. 5,00,000 (Five lakhs) for Sai devotees in case of any untoward incident on the way from their homes to Shirdi. But to get this benefit, the palanquin group coming to Shirdi must officially register with the Trust along with the name of its palanquin group, the names of the people participating in the palanquin, and the Aadhar number. Also, in case of any untoward incident, while coming to Shirdi by private and public vehicles, such Sai devotees will also get the benefit of insurance cover. But these Sai devotees must register in advance for any of the facilities provided by Shri Saibaba Sansthan like Online Room booking (for any bhaktniwas), Aarti Pass, Darshan Pass, Satyanarayan Pass, Abhishek Puja Pass. Shree Sai devotees of any age who have registered in this way will get the benefit of this scheme. In case of any untoward incident on the way to Shirdi, the heirs of those Sai devotees will get an amount of up to 5,00,000/- (Rs Five lakh) as accident insurance from this insurance scheme. Chief Executive Officer Shri Goraksh Gadilkar IAS, has appealed to all Sai devotees and palanquin groups to pay attention to this scheme.
'Talk with Sai' AI Chat bot चॅटबॉट Details
श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘Talk with Sai’ या अत्याधुनिक AI चॅटबॉटचे उद्घाटन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले. या नव्या सुविधेमुळे साई भक्त आणि पर्यटकांना श्री साईबाबा व शिर्डी संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती एका क्लिकवर सहज मिळणार आहे. ‘Talk with Sai’ या चॅटबॉट सुविधेमुळे जगभरातील साई भक्तांना श्री साईबाबांचे जीवनकार्य, शिकवणूक तसेच साईबाबा संस्थानविषयक सर्व माहिती सहज मिळणार आहे. यात ऑनलाइन सेवा, मंदिरातील कार्यक्रम, उत्सव व धार्मिक स्थळांबाबत माहिती मिळणार असून भाविकांना त्यांच्या शंका आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतील. सध्या ही सुविधा इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून लवकरच इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती सुरू करण्यात येणार आहे. श्री साईबाबा संस्थान भक्तांच्या सेवेसाठी नेहमीच नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. या नवीन AI तंत्रज्ञानाच्या मदतीने साईभक्तांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ माहिती मिळेल, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली.
Shree Saibaba Sansthan Trust, has launched the advanced ‘Talk with Sai’ AI chatbot on its official website https://online.sai.org.in. Inaugurated by Hon. CEO Goraksha Gadilkar, this new facility provides Shree Sai devotees and visitors with instant access to all essential information about Shirdi and Shree Saibaba at the click of a button. The chatbot offers comprehensive details about Shree Saibaba life, teachings, and all Trust-related services, including Online services, Temple programs, festivals, and religious sites. Devotees can get prompt answers to their questions in both English and Marathi, with plans to expand to more regional languages soon. This initiative ensures faster, accurate, and user-friendly information for devotees worldwide, as highlighted by Hon. CEO Shri Goraksha Gadilkar (IAS).
Offer donations in foreign currency शिर्डी येथे परकीय चलनाच्या माध्यमातून देणगी स्वीकृतीस मान्यता. Details
श्री साईबाबा संस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बाबांच्या चरणी देणगी अर्पण करण्याची सुविधा आता परकीय चलनामध्ये देखील उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या परवानगीमुळे भाविकांना परकीय चलनातील नोटा, चेक तसेच तत्सम माध्यमांद्वारे देणगी अर्पण करता येणार आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डी येथे येतात. भाविकांना देणगी अर्पण करण्यासाठी रोख, ऑनलाईन, युपीआय, मनीऑर्डर, चेक-डीडी यासह विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये आता परकीय चलनामधून देणगी स्वीकृतीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीमुळे संस्थानला परकीय चलनातील देणगी स्वीकृतीचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करून मिळाले आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांना अधिक सुलभतेने देणगी अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. ज्या भाविकांना परकीय चलन अथवा चेकद्वारे देणगी अर्पण करायची आहे, त्यांनी दक्षिणापेटीत, श्रीसाईबाबा मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर किंवा ऑनलाईन माध्यमातून देणगी अर्पण करता येईल.
Devotees visiting Shree Saibaba Sansthan can now offer donations in foreign currency, following approval from the Ministry of Home Affairs, Government of India. This facility allows devotees to contribute through foreign currency notes, cheques, and similar channels, in addition to existing options like cash, online payments, UPI, money order, and Cheque/DD. Hon. CEO Goraksha Gadilkar(IAS) announced that the Trust's registration for accepting foreign currency donations has been renewed, making the process more convenient for both domestic and international devotees. Donations in foreign currency or by cheque can be made at the donation box, donation counters within the temple premises, or online on https://online.sai.org.in
New Donation Counter at Gate no 1. साईबाबा संस्थानचे नवीन देणगी कार्यालय सुरू. Details
दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने प्रवेशद्वार क्र. १ येथे नवीन देणगी कार्यालयाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु एस. शेंडे (सोनटक्के) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपस्थित होते
On January 16, 2025, the new Donation Office at Entry Gate No. 1 was inaugurated by the Chairperson of the Ad-hoc Committee and Principal District and Sessions Judge, Mrs. Anju S. Shende (Sontakke), in the presence of Hon CEO Goraksha Gadilkar (IAS) and other senior officials. This new facility is designed to provide seamless donation services to devotees.
साईबाबा संस्थानचे नवीन देणगी कार्यालय सुरू.
Devotees in General Queue for Aarti. सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ. Details
दिश्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्याह्न, धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मध्याह्न आरतीवेळी करण्यात आला, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झांसी येथील श्री मनीष रजक आणि सौ. पूजा रजक या साईभक्त दांपत्याला हा मान मिळाला. या साईभक्तांचा सन्मान श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्तांच्या समवेत करण्यात आला. ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते, ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीत अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हा उपक्रम भक्तांच्या भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
The Trust has introduced a new procedure allowing two devotees from the general queue to attend aarti in first row in-front of Shree Samadhi. This will be for daily Noon(Madhyan), Evening (Dhoop), and Night (Shej aarti). This began with honouring devotees Mr. Manish Rajak and Mrs. Pooja Rajak from Jhansi, Uttar Pradesh. This initiative offers ordinary devotees a unique opportunity to participate closely in the Aarti, strengthening their devotion and connection with Shree Saibaba.
सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ.
Windmill energy utilization in Temple Saved Rs 1.74 Crores पवनचक्की प्रकल्पातून हरित उर्जेचा यशस्वी वापर; सात महिन्यांत संस्थानला १.७४ कोटींची बचत" Details
श्री साईबाबा संस्‍थानने सुपा येथे कार्यान्‍वीत केलेल्‍या "पवनचक्की"तून तयार झालेली पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे माहे जानेवारी-२०२४ पासून संस्थानचे नवीन दर्शन रांग व मंदिर परिसरात वापरात आणली असून माहे जुलै-२०२४ अखेर सात महिन्यात रु.१ कोटी ७४ लाख १९ हजार ६५९/- रुपयांची बचत झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. सन २००७ मध्‍ये सुपा येथे "पवनचक्की" प्रकल्‍प सुरु केला. या प्रकल्‍पातून तयार होणारी उर्जा महाराष्ट्र राज्य वीज मंडळास रु.२.५२/-पर यूनिट दराने देणेत येत होती. तीच ऊर्जा आता संस्थानचे नवीन दर्शन रांग व मंदिर परिसरात माहे जानेवारी २०२४ ते जुलै २०२४ अखेर वापरत आणल्याने विजेचा वापर २२ लाख ४१ हजार ४२६ युनिटस झाला, त्यापैकी अंदाजे १५.६ लाख युनिटस साईबाबा संस्थानचे स्वत:च्या पवनचक्कीतून तयार झालेल्या पवन ऊर्जा कॅप्टिव्ह कन्झमशन द्वारे वापरात घेतली. प्रती यूनिट अंदाजे रु.१०/-संस्थानला आर्थिक फायदा झाला आहे. हा वापर जानेवारी २०२४ पासून सुरु झाला आहे. हरित उर्जा निर्मीती क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करणारे देशातील साईबाबा संस्‍थान,शिर्डी हे मोठे तीर्थक्षेत्र असेल. संस्‍थानचा सध्‍याचा एकूण वीजेचा वापर विचारात घेऊन पूर्ण क्षमतेने वीज उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने रुप टॉप सोलर सिस्‍टीम व "पवनचक्की" उर्जा प्रकल्‍पात अधिकतम वाढ करण्‍याचा संस्‍थानचा मानस असल्‍याचेही मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
Shri Saibaba Sansthan has been using the wind energy generated from the Windmill implemented at Supa village near Ahilyanagar, through captive consumption in the New darshan Complex and temple area of the Sansthan saving of Rs. 1,74,19659/- , It has been achieved in the seven months since January 2024 to July 2024, informed Shri Goraksh Gadilkar, Chief Executive Officer of the Sansthan. Windmill project was started at Supa, Ahilyanagar in 2007. From January 2024 to July 2024 total 22,41,426 units of electricity was consume out of which approximately 15.6 lakh units of wind energy generated from the Trust own windmill was used through captive consumption. The Trust has benefited financially by approximately Rs.10/- per unit. Shree Saibaba Sansthan Trust, Shirdi is the largest pilgrimage site in the country to use such a large amount green energy. Considering the current total electricity consumption of the Trust, the trust intends to maximize the Roof Top Solar System and "Windmill" energy project in order to make electricity available at full capacity, said Chief Executive Officer Shri. Goraksha Gadilkar I.A.S
Revised Donation Policy सुधारित देणगी धोरण Details
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच मा. तदर्थ समितीची मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी दिली. या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्‍थान मार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्‍सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा — विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्‍हणून शाल व फोटो, साई चरित्र, उदी- लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादी दिल्या जाणार आहेत. या धोरणामुळे साईभक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. सुधारीत सेवा-सुविधांची माहिती खालीलप्रमाणे.
Lakhs of Sai devotees from all over the country and abroad come to Shirdi to have darshan of Shree Saibaba. Many devotees offer various types of donations at the feet of Shree Saibaba with great faith. The revised donation policy has recently been approved to enhance the services and facilities of the donating Sai devotees, informed by CEO Goraksha Gadilkar, Chief Executive Officer of Shree Saibaba Sansthan. According to this decision, apart from the four major festivals celebrated by Shree Saibaba Sansthan, various types of services and facilities will be provided to the donating Sai devotees according to the category of their donation - especially darshan, aarti facilities, shawls and photos, Sai Charitra, Udi-Ladu Prasad, food passes, etc as honors. With this policy, the Sansthan is trying to provide better facilities to the Sai devotees. The details of the improved services and facilities are as follows. १) रुपये १०,०००/- ते रु.२४,९९९/- पर्यंतचे दान- Donations from Rs. 10,000/- to Rs. 24,999/- देणगीदार साईभक्‍तास एका वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती पास दिला जाईल तसेच ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ लाडु प्रसाद पॅकेट दिले जातील. The donating Sai devotees will be given an Aarti pass for 5 family members at a time, as well as 5 Udi Prasad packets, 1 Laddu Prasad packet. २) रुपये २५,०००/- ते रु.५०,०००/- पर्यंतचे दान- Donation from Rs.25,000/- to Rs.50,000/- देणगीदार साईभक्‍तास दान करते वेळी दोन वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती / दर्शन पास दिला जाईल. तसेच, एक 3D पॉकेट फोटो, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, २ लाडु प्रसाद पॅकेट्स दिले जातील. At the time of donation, the donor will be given two Aarti/Darshan passes for 5 family members. Also, one 3D pocket photo, 5 Udi Prasad packets, 1 Sai Satcharitra book, 2 Laddu Prasad packets will be given. ३) रुपये ५०,००१/- ते रु.९९,९९९/- पर्यंतचे दान – Donation from Rs. 50,001/- to Rs. 99,999/- देणगीदार साईभक्‍तास दान करते वेळी कुटुंबातील ५ सदस्यांसाठी दोन VVIP आरती पास दिले जातील. त्याचबरोबर एक 3D पॉकेट फोटो, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, २ लाडु प्रसाद पॅकेट्स दिले जातील. The donor will be given two VVIP Aarti passes for 5 family members at the time of donation. Along with this, one 3D pocket photo, 5 Udi Prasad packets, 1 Sai Satcharitra book, 2 Laddu Prasad packets will be given. ४) रुपये १ लाख ते रु.९,९९,९९९/- पर्यंतचे दान- Donations between Rs. 1 lakh and Rs. 9,99,999/- देणगीदार साईभक्‍तांस त्‍यांनी दान केलेल्‍या वर्षामध्‍ये २ VVIP आरती पास मिळतील तसेच नंतरच्‍या वर्षामध्‍ये त्‍यांनी केलेल्‍या दानाप्रमाणे प्रति वर्ष १ VVIP आरती पास मिळेल. (उदाहरणार्थ, पाच लाख रुपयांच्या दानासाठी, पहिल्‍या वर्षी २ VVIP पास मिळतील नंतरच्‍या चार वर्षासाठी प्रत्‍येक वर्षी १ VVIP पास मिळेल). त्‍यांना गेट नं. ६ किंवा त्या वेळी कार्यरत असलेल्या सशुल्‍क दर्शन रांगेतून कुटुंबाच्या ५ सदस्यांसाठी तहहयात वर्षातुन १ वेळेस मोफत दर्शन सुविधा दिली जाईल तसेच, साईभक्‍तास देणगी दिल्‍यानंतर एक वेळेस बहुमान म्‍हणुन, १ सन्‍मान शॉल, १ 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, १ 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ३ लाडू प्रसाद पॅकेट्स आणि कुटुंबातील ५ सदस्यांसाठी मोफत VIP प्रसाद भोजन पास दिले जातील. The Sai devotees will get 2 VVIP Aarti passes in the year of donation and 1 VVIP Aarti pass per year for each subsequent year of donation. (For example, for a donation of Rs. 5 lakhs, 2 VVIP passes will be given in the first year and 1 VVIP pass every year for the next four years). They will be given darshan pass for paid darshan pass queue from gate no. 6 or whichever applicable at time of darshan, for 5 members of the family once in a year for whole life. Also, after donating to Shree Sai devotees will be honour with shawl, 1 3D Desk Note Holder / 3D Shape photo, 1 3D pocket photo, Abhishek / Satyanarayan Puja coupon, 5 Udi Prasad packets, 1 Sai Satcharitra book, 3 Laddu Prasad packets and free VIP Prasad meal pass for 5 family members will be given as a one-time honour. ५ ) रुपये १० लाख ते ५० लाख पर्यंत दान: Donation from Rs. 10 lakh to Rs. 50 lakh: देणगीदार साईभक्‍तास त्‍यांनी देणगी दिलेल्‍या प्रमाणात प्रत्येक वर्षी २ VVIP आरती पास मिळतील, (उदाहरणार्थ, ३० लाख रुपयांच्या दानासाठी, ३० वर्षांसाठी प्रति वर्ष २ VVIP पास मिळतील). Donating Sai devotees will get 2 VVIP Aarti passes every year, depending on the amount they donate, (For example, for a donation of Rs. 30 lakhs, 2 VVIP passes per year will be given for 30 years). देणगीदार साईभक्‍ताचे कुटुंबातील ५ सदस्यांना तहहयात वर्षातून एक वेळेस मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल. Free protocol darshan will be given once a year to 5 family members of the donor Sai devotee during his lifetime. देणगीदार साईभक्‍तास वर्षात एक वेळेस श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्‍यासाठी वस्‍त्र देण्‍याची संधी दिली जाईल. (उदा. प्रत्येक रु.१० लाख दानासाठी एकवेळेस वस्‍त्र परिधान करण्‍यासाठी वस्‍त्र देण्‍याची संधी मिळेल (उदाहरणार्थ, ३० लाख रुपयांच्या दानासाठी देणगीदारास ३ वर्षे वस्त्र देण्‍याची संधी मिळेल). Donor Sai devotees will be given the opportunity to offer clothes to Shree Saibaba once a year. (For example, for every Rs.10 lakhs, the donor will get the opportunity to offer clothes for once a year. If donation is Rs 30 Lakh will get opportunity to offer clothes for 3 years) देणगीदार साईभक्‍तास दान करतेवळी एक वेळेस श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र भेट म्‍हणून दिले जाईल. When donating cloths to Shree Saibaba, the donor will be given a gift of the clothes worn by Shree Saibaba (Only once). देणगीदार साईभक्‍तांस दान करतेवेळी बहुमान म्‍हणून , १ सन्‍मान शॉल, १ श्री साईंची मूर्ती, 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ५ लाडू प्रसाद पॅकेट्स, कुटुंबातील ५ सदस्यांसाठी मोफत VIP प्रसाद भोजन पास मिळेल. As a token of appreciation, donors will receive 1 Shawl, 1 Shree Saibaba idol, 3D Desk Note Holder / 3D I Shape Photo, 3D Pocket Photo, Abhishek / Satyanarayan Puja Coupon, 5 Udi packets, 1 Sai Satcharitra book, 5 Laddu Prasad packets, and free VIP Prasad meal pass for 5 family members while donating. ६) रुपये ५० लाख आणि त्याहून अधिकचे दान- Donations of Rs. 50 lakh and above- देणगीदार साईभक्‍तास तहहयात ५ सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष ३ VVIP आरती पास मिळतील. Donor devotee will get 3 VVIP Aarti passes per year for a family of 5 members during their lifetime. देणगीदार साईभक्‍तास श्री साईबाबांना परिधान करण्‍यासाठी वस्‍त्र देण्‍याची संधी दिली जाईल, (उदा. प्रत्‍येक रु.१० लाखच्या दानासाठी एक वस्त्र देण्‍याची संधी मिळेल ) ही वस्त्र देणगीदार साईभक्‍त आयुष्‍यभरात कधीही दान करू शकतात. त्‍याकरिता १ महिना पुर्वी कळविणे बधंनकारक राहील. Donor devotee will be given the opportunity to offer clothes to Shree Saibaba, (e.g. for every donation of Rs. 10 lakhs, one cloth will be given). Donor Sai devotees can offer these clothes anytime during their lifetime. For this, it will be mandatory to inform 1 month in advance. देणगीदार साईभक्‍तांस दान करतेवेळी श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र (१ सेट)भेट म्‍हणून दिले जाईल. While donation, Donors will be gifted with a set of clothes worn by Shree Saibaba. देणगीदार साईभक्‍तासह कुटूबांतील ५ सदस्‍यांना प्रत्येक वर्षी २ प्रोटोकॉल VVIP दर्शन पास मिळतील, ही सुविधा तहहयात लागू राहील. Donor Sai devotees along with 5 family members will get 2 protocol VVIP darshan passes every year, this facility will remain valid for life देणगीदार साईभक्‍तास बहुमान म्‍हणून, १ सन्‍मान शॉल, १ श्री साईंची मूर्ती, 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ५ लाडु प्रसाद पॅकेट्स, देणगीदार साईभक्‍ताच्‍या कुटुंबातील ५ सदस्‍यांना मोफत VIP प्रसाद भोजन पास मिळेल. As a token of appreciation to the donor, 1 Shawl, 1 Shree Saibaba idol, 3D Desk Note Holder / 3D I shape photo, 3D pocket photo, Abhishek / Satyanarayan Puja coupon, 5 Udi packets, 1 Sai Satcharitra book, 5 Laddu Prasad packets, 5 members of the family will get free VIP Prasad Bhojan pass.
108-Feet National Flag Inaugurated at Shri Saibaba Temple Complex श्री साईबाबा मंदिर परिसरात १०८ फूट राष्ट्रध्वजाचे लोकार्पण Details
देशप्रेम आणि आध्यात्माचा संगम श्री साईबाबा मंदिर, शिर्डी येथे आज एक ऐतिहासिक क्षण साकार झाला. "फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया" च्या देणगीतून मंदिर परिसरातील गेट क्रमांक ०१ जवळ उभारण्यात आलेल्या १०८ फूट उंच भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गणमान्यांची उपस्थिती कार्यक्रमाचे उद्घाटन फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार नवीन जिंदाल, शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्थानचे विविध अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नवीन जिंदाल यांनी राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. फ्लॅग फाउंडेशनच्या वतीने लेफ्ट. कर्नल सुनील नरोला यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रेरणास्रोत हा भव्य राष्ट्रध्वज श्री साईबाबांच्या पावन भूमीवर देशाभिमान आणि भक्तिभावाचा संगम साधणारा एक मानबिंदू म्हणून साईभक्तांना प्रेरणा देत राहील.
Confluence of Patriotism and Spirituality A historic moment was realized today at Shri Saibaba Temple, Shirdi. The magnificent 108-foot tall national flag, erected near Gate No. 01 of the temple complex through the generous donation of "Flag Foundation of India," was inaugurated with great enthusiasm. Distinguished Guests The inauguration ceremony was conducted by Naveen Jindal (Chairman of Flag Foundation of India and Member of Parliament), Bhausaheb Wakchaure (MP, Shirdi constituency), and Goraksh Gadilkar (IAS, Chief Executive Officer of Shri Saibaba Sansthan). The occasion was attended by various Sansthan officials, employees, Shirdi residents, and numerous Sai devotees. Program Highlights MPs Bhausaheb Wakchaure and Naveen Jindal expressed their satisfaction about this initiative that awakens patriotic feelings. Lt. Colonel Sunil Narola, representing the Flag Foundation, extended gratitude to all attendees. Source of Inspiration This magnificent national flag will continue to inspire Sai devotees as a landmark that harmonizes patriotism and devotional spirit on the sacred land of Shri Saibaba.