New Initiatives by Shree Sai Baba Sansthan Trust, Shirdi
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथील नवीन उपक्रम
1. Paid Darshan Pass Kiosk System
सशुल्क पासकरिता किऑस्क सिस्टीम
English:
To enhance convenience for devotees, Shree Sai Baba Sansthan Trust inaugurated a Paid Darshan Pass Kiosk near Entry Gate No. 1 on April 6, 2025, during the auspicious Ram Navami festival. This initiative allows devotees to obtain paid darshan passes quickly and easily, with digital payment options available at all Bhaktaniwas locations and an additional counter at the bus stand. Self-service kiosks and digital payment facilities have also been set up at the PRO office near Gate No. 6. Owing to the enthusiastic response from devotees, four kiosks have been installed at Gate No. 1. This modern facility has been widely appreciated for making the darshan process more seamless and accessible for all. (Inaugurated by Hon Shri Goraksha Gadilkar and Shri Bhimraj Darade)
मराठी:
साई भक्तांच्या सुविधेसाठी, श्री साईबाबा संस्थानने ६ एप्रिल २०२५ रोजी रामनवमी उत्सवाच्या दिवशी प्रवेशद्वार क्र. १ जवळ सशुल्क दर्शन पास किऑस्कचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे साई भक्तांना सशुल्क दर्शन पास सहज आणि जलद मिळू शकतात. सर्व भक्तनिवासस्थानांमध्ये आणि बस स्टँडवर अतिरिक्त काउंटरवर डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, गेट नं. ६ येथील पीआरओ कार्यालयातही सेल्फ सर्विस किऑस्कची सोय करण्यात आली आहे. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गेट नं. १ येथे चार किऑस्क बसवण्यात आले आहेत. या आधुनिक सुविधेमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. (उद्घाटन: हो. श्री गोरक्षक गाडीलकर व श्री. भिमराज दराडे)
2. Online Sai Sevak Registration
साईसेवक नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणाली
English:
The Trust has introduced an online registration system for Sai Sevaks, enabling devotees who wish to offer voluntary service to register conveniently through the Trust’s modern web portal. Registered groups of Sai Sevaks are given a seven-day opportunity to serve. This digital approach has made the process more transparent and accessible, and devotees have expressed great satisfaction with the new system.
मराठी:
संस्थानने साई सेवकांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. मोफत सेवा देऊ इच्छिणाऱ्या भक्तांना संस्थेच्या आधुनिक वेब पोर्टलवरून सहजपणे नोंदणी करता येते. नोंदणीकृत साई सेवकांच्या समूहाला सात दिवस सेवा करण्याची संधी दिली जाते. या डिजिटल सुविधेमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली असून, भक्तांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
3. Entry Pass Facility at Gate No. 4
गेट नंबर चार येथे मंदिर परिसर प्रवेश पासची सोय
English:
To facilitate access for villagers and devotees visiting the Shri Shaneshwar, Shri Ganesh, and Shri Mahadev temples within the Samadhi Mandir complex, as well as those coming for meditation and scripture recitation, an entry pass system has been introduced at Gate No. 4. This new arrangement has made entry into the temple premises smoother and has been warmly welcomed by the local community and devotees.
मराठी:
श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरातील श्री शनैश्वर, श्री गणेश आणि श्री महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या गावकरी, भक्त, तसेच ध्यान मंदिर व पारायण कक्षात येणाऱ्यांसाठी गेट नं. ४ येथे प्रवेश पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे मंदिर परिसरात प्रवेश करणे अधिक सुलभ झाले असून, गावकरी व भक्तांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
4. Revised Donation Policy: Enhanced Donor Benefits
सुधारित देणगी धोरण: साईभक्तांना मिळणार अधिक सुविधा
English:
The Trust has implemented a revised donation policy to offer enhanced benefits to donors. Depending on the donation amount, donors and their families receive privileges such as special darshan or aarti passes, honor shawls, photos, Sai Charitra books, Udi and Ladoo Prasad, and meal passes. For donations above ₹10 lakh, donors are entitled to lifetime annual privileges, including the opportunity to offer clothes to Sai Baba and receive special mementos. This policy reflects the Trust’s commitment to recognizing the devotion and generosity of its donors.
मराठी:
संस्थानने सुधारित देणगी धोरण लागू केले असून, देणगीदारांना त्यांच्या देणगीच्या रकमेप्रमाणे विशेष सेवा-सुविधा दिल्या जातात. यात विशेष दर्शन/आरती पास, सन्मान शाल, फोटो, साई चरित्र, उदी-लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादींचा समावेश आहे. १० लाखांपेक्षा जास्त देणगीदारांना आयुष्यभर वार्षिक विशेष सुविधा मिळतात, ज्यात साईबाबांना वस्त्र अर्पण करण्याची संधी आणि स्मृतिचिन्हे दिली जातात. या धोरणामुळे देणगीदारांच्या श्रद्धेला आणि उदारतेला संस्थानकडून मान्यता मिळते.
Donation Policy Table (English):
Donation Amount (INR) | Facilities/Benefits |
---|---|
₹10,000 – ₹24,999 |
|
₹25,000 – ₹50,000 |
|
₹50,001 – ₹99,999 |
|
₹1,00,000 – ₹9,99,999 |
|
₹10,00,000 – ₹50,00,000 |
|
Above ₹50,00,000 |
|
देणगी धोरण तक्ता (मराठी):
देणगीची रक्कम (रु.) | सुविधा / लाभ |
---|---|
रु. १०,००० – रु. २४,९९९ |
|
रु. २५,००० – रु. ५०,००० |
|
रु. ५०,००१ – रु. ९९,९९९ |
|
रु. १,००,००० – रु. ९,९९,९९९ |
|
रु. १०,००,००० – रु. ५०,००,००० |
|
रु. ५०,००,००० आणि त्याहून अधिक |
|
5. MHT-CET Coaching Classes
एमएचटी-सीईटी (MH-CET) क्लासेस
English:
With a focus on educational empowerment, the Trust has launched smart digital learning and coaching classes for MHT-CET aspirants, particularly benefiting students from its educational campus and nearby rural areas. Nationally reputed institutions with experienced IITians/NITians will conduct these classes. Students who score above 90% in Class 10 will receive free coaching, while those with less than 90% marks and enrolled in Sai Baba Junior College will get a 50% fee waiver. Orphaned students and children of single mothers scoring above 80% will also receive full fee waivers. This initiative aims to provide quality education and opportunities for rural and underprivileged students.
मराठी:
शैक्षणिक सक्षमीकरणावर भर देत, संस्थानने एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग आणि कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत. हे वर्ग संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील आणि परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणि अनुभवी IITians/NITians असलेल्या संस्था हे वर्ग घेणार आहेत. १०वीमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग दिले जाईल, तर ९०% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या आणि साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ५०% फी माफ केली जाईल. अनाथ आणि एकल मातांची मुले (८०% पेक्षा जास्त गुण) यांना पूर्ण फी माफ केली जाईल. या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार आहे.
6. Free German Language Classes
जर्मन भाषा क्लासेस
English:
To boost international job prospects for its students, the Trust’s Industrial Training Institute (ITI) has started free German language classes. Many students from rural and economically weaker backgrounds are now able to learn German without financial burden. Recently, two students from the ITI were selected for jobs and dual degree programs in Germany. This initiative has been highly appreciated by both students and parents.
मराठी:
विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी संस्थानच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विनामूल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आता कोणतीही आर्थिक अडचण न येता जर्मन भाषा शिकता येते. नुकतेच दोन विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये नोकरीसाठी आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह पालकांनीही स्वागत केले आहे.
7. Scholarship Coaching Classes
स्कॉलरशिप क्लासेस
English:
Special coaching classes have been started for students of Sai Baba English Medium School and Kanya Vidya Mandir to prepare them for various scholarship exams. This ensures that students from rural backgrounds are not left behind in today’s competitive era, and the initiative has resulted in improved academic performance and satisfaction among parents.
मराठी:
श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल आणि कन्या विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहणार नाहीत. या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारली असून, पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
8. Digital Classrooms and Wi-Fi Enabled Campus
डिजिटल क्लासरूम व वायफाय युक्त कॅम्पस
English:
The Trust has developed a grand educational complex equipped with digital classrooms, Wi-Fi connectivity, a modern theatre, swimming pool, badminton and table tennis courts, and sports grounds. Senior college courses like B.Sc. Computer Science and Bachelor in Computer Applications have been started, with a 120-computer lab now operational for students. This modern infrastructure is designed to provide students with a holistic and technologically advanced learning environment.
मराठी:
संस्थानने एकत्रित भव्य शैक्षणिक संकुल उभारले असून, डिजिटल क्लासरूम, वाय-फाय, थिएटर, स्विमिंग पूल, बॅडमिंटन, टेबल टेनिस कोर्ट आणि विविध खेळांची मैदाने उपलब्ध केली आहेत. वरिष्ठ महाविद्यालयात बीएससी कॉम्प्युटर सायन्स व बीसीए कोर्सेस सुरू झाले असून, १२० संगणकांचा लॅब कार्यान्वित आहे. हे आधुनिक संकुल विद्यार्थ्यांना सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
9. Advanced Computerization in Hospitals
हॉस्पिटलसाठी अद्ययावत संगणक प्रणाली
English:
Both Shri Sai Baba Super Hospital and Shri Sainath Charitable Hospital have implemented advanced software systems for administrative and medical services, along with new high-capacity servers. This computerization will enhance efficiency and patient convenience, and full-scale implementation is underway to ensure seamless healthcare delivery.
मराठी:
श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल व श्री साईनाथ चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये कार्यालयीन व वैद्यकीय सेवांसाठी अद्ययावत संगणक प्रणाली व उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे प्रशासकीय गती आणि रुग्णांसाठी सुलभता वाढणार असून, लवकरच संपूर्ण हॉस्पिटल संगणीकृत होईल.
10. Shri Sainath Eye Bank
श्री साईनाथ नेत्रपेढी
English:
The Sainath Eye Bank was inaugurated on March 13, 2025, at the Sainath Hospital. The facility, started with the support of generous donors, has already enabled successful corneal transplants, restoring vision to several patients. This initiative is a boon for the visually impaired and has been warmly acknowledged by the community.
मराठी:
श्री साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा १३ मार्च २०२५ रोजी श्री साईनाथ रुग्णालयात पार पडला. या सुविधेमुळे यशस्वी नेत्र प्रत्यारोपण करून अनेकांना दृष्टी मिळाली आहे. नेत्रपेढी सुरू झाल्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला असून, या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.
11. Insurance Cover for Devotees
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना पाच लाखांचे विमा कवच
English:
Sai devotees traveling to Shirdi, whether by private or public vehicles or on foot with a palanquin, are now covered by an insurance policy of ₹5 lakh against untoward incidents during their journey. To avail of this benefit, palanquin groups must register with the Trust, providing names and Aadhaar numbers of participants. This initiative provides security and peace of mind to all devotees visiting Shirdi.
मराठी:
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पाच लाख रुपयांचे विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. पायी यात्रा करणाऱ्या पालखी मंडळांनी आणि वाहनाने येणाऱ्या भक्तांनी संस्थानमध्ये नावनोंदणी केल्यास हा लाभ मिळू शकतो. या उपक्रमामुळे भक्तांना सुरक्षिततेची हमी मिळणार आहे.