Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने आवाहन
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल, शिर्डी यांच्या वतीने दि. १४ जुलै २०२६ ते दि. १७ जुलै २०२६ या कालावधीत “श्री साईबाबा राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
श्री साईबाबांच्या जीवनचरित्र, सेवाभाव, मानवता, श्रद्धा व सबुरी या विचारांचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा तसेच मराठी भाषा, साहित्य, वक्तृत्वकला व वैचारिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी (लहान गट) व इयत्ता ८ वी ते १० वी (मोठा गट) अशा दोन गटांत होणार असून सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक रोख पारितोषिके, श्री साईचरित्र ग्रंथ, स्मृतिचिन्हे व सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी नोंदणी पूर्णतः विनामूल्य असून सहभागी स्पर्धकांसाठी अल्पोपहार, भोजन व निवासाची व्यवस्था श्री साईबाबा संस्थानतर्फे करण्यात येणार आहे.
स्पर्धेची सविस्तर माहिती व ऑनलाइन नोंदणी फॉर्म online.sai.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

Recent News