Languages

  Download App

महिला सुरक्षा रक्षकाने सापडलेले पैसे प्रमाणिकपणे केले साईभक्‍तांना परत...

महिला सुरक्षा रक्षकाने सापडलेले पैसे प्रमाणिकपणे केले साईभक्‍तांना परत...

महिला सुरक्षा रक्षकाने सापडलेले पैसे प्रमाणिकपणे केले साईभक्‍तांना परत...

श्री साईबाबांच्‍या दर्शनाकरीता देश-विदेशातून दररोज हजारो साईभक्‍त येत असतात. या साईभक्‍तांना सेवा-सुविधा पुरविणेचे काम संस्‍थान कर्मचारी प्रामाणिकपणे करीत असतात. हे काम करत असतांना विविध विभागातील कर्मचा-यांना वस्‍तु अगर पैसे सापडतात. सापडलेली वस्‍तु अगर पैसे प्रामाणिकपणे जमा करणा-या कर्मचा-यांचा संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी वेळोवेळी सत्‍कार करतात. याबाबत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे/सिनारे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. 
दि.२२ ऑगस्‍ट २०२४ रोजी गेट नं.०३ येथे डयुटीवर कार्यरत असणा-या कंत्राटी महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबीताई नागरे यांना रुपये १८,७५०/- सापडले. सदरची रक्‍कम त्‍यांनी प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली. ज्‍या साईभक्‍तांचे पैसे हरवले होते त्‍यांनी संरक्षण कार्यालयाशी संपर्क केला असता त्‍यांची ओळख पटवून त्‍यांना त्‍यांची हरवलेली रक्‍कम रु. १८,७५०/- परत करणेत आली. ज्या भक्ताचे पैसे हरविले होते ते त्यांना परत मिळाल्याने त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले तसेच सापडलेले पैसे प्रमाणिकपणे जमा करणा-या माहिला सुरक्षारक्षकाचे आभार मानले. या घटनेची माहिती मुंबई येथील एका साईभक्‍तांस मिळाली असता त्‍यांनी  श्रीमती नागरे यांना प्रोत्‍साहनपर गूगल पे ने रु. ५०००/- पाठवले.  श्रीमती नागरे यांच्‍या प्रामाणिकपणा बद्दल संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी यांनी शाल व भेटवस्‍तू देवून त्‍यांचा सत्‍कार केला.  यामुळे सर्व कर्मचा-यांत सकारात्‍मक उर्जा निर्माण होत असून संस्‍थानच्‍या नावलौकिकात वाढ होत आहे.  याघटने बद्दल श्रीमती नागरे यांचे सर्व स्‍तरातून कौतूक होत आहे.

Undefined
महिला सुरक्षा रक्षकाने सापडलेले पैसे प्रमाणिकपणे केले साईभक्‍तांना परत...
Friday, August 23, 2024 - 20:00