Languages

   Download App

News

News

आरोग्यदायी साई आमटी : पौष्टिक प्रसादाची खासियत
शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी येथे येणाऱ्या श्री साईभक्तांसाठी दर गुरुवारी श्री साईप्रसादालयात विशेष “साई आमटी” प्रसादरूपाने दिली जाणार आहे. कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम तसेच खनिजांनी समृद्ध असल्याने ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळींचे अनोखे मिश्रण. मूग डाळ, मठ डाळ आणि हरभरा डाळ यांचा समतोल वापर केल्यामुळे प्रथिनांचे प्रमाण भरपूर आहे. त्यात खोबरे आणि शेंगदाण्याचा हलका स्पर्श आमटीला खास चव देतो.
चव व सुवास वाढवण्यासाठी कांदा, आले-लसूण पेस्ट, हळद, हिंग, हिरवी मिरची, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ यांचा वापर केला जातो. मोहरी, जिरे व कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेली ही आमटी कोथिंबिरीने सजवली जाते.
साई मंदिरातील प्रसाद भोजनाचा भाग म्हणून ही पौष्टिक आमटी चपाती किंवा गरम भातासोबत भक्तांना दिली जाईल. साईभक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी “सात्विक अन्नातून सेवा” या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी ओळख देईल.

Recent News