श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी विणा घेऊन तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.