Languages

  Download App

श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचा भक्तिमय शुभारंभ

श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचा भक्तिमय शुभारंभ

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी तर्फे आयोजित "श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळा" चा आज दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजता संस्‍थानच्‍या प्रवेशद्वार क्रमांक ४ येथून शुभारंभ झाला. या प्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, माजी विश्वस्त कैलासबापू कोते, मा.नगरसेवक हरीचंद्र कोते, प्रतापराव जगताप, अमृत गायके, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, विभाग प्रमुख विजय वाणी, अतुल वाघ, शिर्डी ग्रामस्‍थ, संस्‍थान कर्मचारी, साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Undefined
श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचा भक्तिमय शुभारंभ
Thursday, April 10, 2025 - 09:15