Languages

   Download App

श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट परिचारकांचा सन्मान

श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट

श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा केला जातो. हा दिवस आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय सेवेस समर्पित परिचारक/परिचारिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय सेवेप्रती निष्ठा दर्शविणाऱ्या शपथविधीने झाली. यानंतर भारत-पाकिस्तान सीमारेषेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या १२ परिचारक/परिचारिकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्‍ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्‍मान करण्‍यात आला. त्यामध्ये सविता जाधव, सुचिता मुठाळ, सुवर्णा व्हनमाने, मिनाश्री ओहोळ, सविता बनसोडे, मनिषा सदाफळ, स्वाती मंतोडे, असिमखान पठाण, दीपाली वर्पे, इरफान खान पठाण, नैना चौधरी आणि सोनल साबळे यांचा समावेश होता. 
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सन्मानित परिचारक/परिचारिकांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य कर्मचाऱ्यांनीही समर्पित भावनेने कार्य करून संस्थान रुग्णालयाची सेवा आणि नावलौकिक वृद्धिंगत करावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक (से.नि.), उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, मनुष्यबळ व्यवस्थापक रविंद्र नवले, सहा. अधिसेविका मंदा थोरात, प्र. अधिसेविका नजमा सैय्यद, रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टर्स व परिचारक/परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदा थोरात यांनी तर सूत्रसंचालन सुरेश टोलमारे यांनी केले.

Undefined
श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट परिचारकांचा सन्मान
Monday, May 12, 2025 - 17:45