Languages

   Download App

News

News

ध्‍यानमंदिराचे उदघाटन

July 26th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने मंदिर परिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन उभारण्‍यात आलेल्‍या ध्‍यानमंदिराचे उदघाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले.

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, सौ.नलिनी हावरे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.हावरे म्‍हणाले की, जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्‍त शिर्डी येथे येतात. यामुळे शिर्डी ही नेहमी गजबजलेली असते. अशा या गजबलेल्‍या ठिकाणी ज्‍या साईभक्‍तांना १० ते १५ मिनिटे ध्‍यान करुन मानसिक शांतता, स्‍थर्ये व बाबांची अनुभूती मिळावी याकरीता शांततामय अशी जागा नव्‍हती. त्‍यामुळे साईभक्‍तांकडून अनेक दिवसांपासुन ध्‍यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरातील साई सत्‍यव्रत हॉलचे पहिल्‍या मजल्‍यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन २७०० चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ असलेले ध्‍यानमंदिर उभारण्‍यात आलेले आहे. या ध्‍यानमं‍दिराचा शेकडो साईभक्‍त दररोज लाभ घेवू शकतील. हे ध्‍यानकेंद्र साऊंड प्रुप व वातानुकुलित असे असेल जेणे करुन त्‍याठिकाणी शांतता निर्माण होवून भक्‍तांना ध्‍यान करता येईल असे डॉ.हावरे यांनी सांगितले.

Recent News