Languages

   Download App

News

News

वृक्षरोपण कार्यक्रम

July 4th, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वनमहोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने साईनगर मैदानाच्‍या पाठीमागील जागेवर संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करण्‍यात आले.

याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर, माजी उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चना कोते, सौ.नलिनी हावरे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक, अध्‍यापक, विद्यार्थी, संस्‍थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.हावरे म्‍हणाले की, महाराष्‍ट्र शासनाचे आभार मानले पाहिजेत, कारण शासनाने वनमहोत्‍सवा सारखा महत्‍वकांक्षी कार्यक्रम हाती घेवून ३३ कोटी झाडे लावण्‍याचा संकल्‍प केला. इतक्‍या मोठया प्रमाणात झाडे लावण्‍याचा संकल्‍प कुठल्‍याच प्रांताने केला नसेल. राज्‍याचे वन मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्‍या वर्षी ०१ कोटी, दुस-या वर्षी ०२ कोटी, तिस-या वर्षी ७ कोटी, चौथ्‍या वर्षी १५ कोटी झाडे लावण्‍याचा संकल्‍प पुर्ण केला असून आता या पाचव्‍या वर्षी ३३ कोटी झाडे लाण्‍याचा संकल्‍प केला आहे. यात खारीचा वाटा म्‍हणुन श्री साईबाबा संस्‍थानने वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

आपल्‍या सर्वांना जगण्‍यासाठी प्राण वायु आवश्‍यक आहे. हा प्राण वायु आपल्‍याला झाडेच देतात. मात्र झाडे लावले नाही तर काही वर्षात आपल्‍याला पाठीवर ऑक्‍सीजनचा सिलेंडर घेवून शाळेत, ऑफिसला जावे लागेल. त्‍यामुळे अशी परिस्थिती येवु नये, असे वाटत असेल तर प्रत्‍येकाने दरवर्षी पाच झाडे लावण्‍याचा संकल्‍प केला पाहीजे. जस-जसे शहरीकरण वाढत आहे तस-तसे वनीकरण कमी होत आहे. वनीकरण वाढविण्‍याची आवश्‍यकता आहे. झाडांचे महत्‍व प्रत्‍येकाने समजुन घ्‍यायला हवे असे डॉ.हावरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विकास शिवगजे यांनी केले.

Recent News