Languages

   Download App

News

News

Shri Gurupornima festival main day news & Photo

July 16th, 2019

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गोव्‍यासह राज्‍याच्‍या विविध भागातून आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. ०५.०० श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी पोथी, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी विणा तर विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, सौ.नलिनी हावरे, सौ.सरस्‍वती वाकचौरे, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज सकाळी ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०६.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, अमित हावरे व सौ.रिचा हावरे आदि मान्‍यवर उपस्थित होते. श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर मध्‍यप्रदेश राज्‍यातील छिंदवाडा येथील देणगीदार श्री.गोपाल कृष्‍ण यांनी सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किंमतीची मारुती सुझ्युकी कंपनीची मालवाहतुक श्रेणीतील घंटागाडी (कचरा वाहतुक) देणगी स्‍वरुपात दिली. या गाडीची संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते पुजा करण्‍यात आली. गोव्‍यासह राज्‍यातील मुंबई, अंधेरी, पालघर, अलिबाग, कोळीवाडा, नंदुरबार, जळगांव, धुळे, औरंगाबाद, सांगली, सटाणा, श्रीगोंदा, पारनेर, अकोले, गेवराई, शेवगांव, लासलगांव आदी ठिकाणाहुन आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०४.०० ते सायं.०६.०० यावेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० वाजता पं.राजा काळे, पुणे यांचा अभंग कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. या कार्यक्रमास श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले. रात्रौ १२.०० श्रींची शेजारती झाली.

उद्या उत्सवाच्या सांगता दिनी दिनांक १७ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांचा गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत श्री.मदन चौहान, रायपूर यांचा भजन संध्‍या कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

Recent News