Languages

  Download App

शिर्डीत साई भक्तांसाठी ग्रंथालय आणि अभ्यासिका कक्ष सुरू

शिर्डीत साई भक्तांसाठी ग्रंथालय आणि अभ्यासिका कक्ष सुरू

आज गुरुवार, दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. गुरुस्‍थान मंदिराच्‍या दक्षिण बाजूस असलेल्‍या संस्‍थानच्‍या साईनाथ छाया या इमारतीत “श्री साईबाबा  ग्रंथालय आणि आभ्‍यासिका कक्ष” या उपक्रमाचा शुभारंभ शिर्डी साई ग्‍लोबल फाऊंडेशन, नवी दिल्‍लीचे अध्‍यक्ष तथा साईभक्‍त श्री चंद्रभानू सत्‍पथी (गुरुजी) यांचे शुभहस्‍ते करणेत आला. यावेळी श्री सत्‍पथी (गुरुजी) यांनी संस्‍थानला सन १९१९ च्या साईनाथप्रभा तसेच साईलीला अंकाच्‍या काही जुन्‍या मुळ छायांकित प्रती भेट दिल्‍या. यानंतर संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री सत्‍पथी (गुरुजी) यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.
याप्रसंगी संस्‍थानचे प्र.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,प्र प्रकाशने विभागप्रमुख सुनिता सोनवणे  तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, पत्रकार, ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.

Undefined
शिर्डीत साई भक्तांसाठी ग्रंथालय आणि अभ्यासिका कक्ष सुरू
Thursday, February 27, 2025 - 14:30