अवघे तिन दिवसात झाले ११३ रुग्णांची मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया .
श्री.साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी, श्री साईनाथ रुग्णालय येथील नेत्ररोग विभागात दि.३०/०५/२०२४, दि.३१/०५/२०२४ व दि.०१/०६/२०२४ या ०३ दिवसात ११३ रुग्णांवर मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणेत आली. दि.१२/०५/२०२४ रोजी सकाळी १० ते सांयकाळी ०५ वा.पर्यंत या वेळेत श्री साईनाथ रुग्णालयात डोळयाची तपासणी शिबीर आयोजीत केलेले होते. सदर शिबीरामध्ये तपासणी शिबीरात ९०० रुग्णांपैकी १५० रुग्णांना मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणेचा सल्ला देणेत आला होता. त्यापैकी या शिबीरात मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी १२४ रुग्ण भरती झालेले होते त्यातील ११३ रुग्णांचे आतापर्यंत शस्त्रक्रिया झालेल्या असुन उर्वरीत ११ रुग्णांची मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणेत येणार आहे.
सदर शिबीर यशस्वी व्हावे याकरीता श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर, डॉ.अजित पाटील, डॉ.अनघा विखे, डॉ.प्राजक्ता खर्चे (मुळे) डॉ.सुप्रिया पाटील (तोरकडी) यांनी तसेच श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील सर्व टीमचे अभिनंदन केले असुन रुग्णालयात आलेल्या एकही गरजवंत रुग्ण मोतिबिंदु शस्त्रकिया विना राहणार नाही याची काळजी द्यावी. व बाकीच्या विभागांनी सुद्धा अशा प्रकारे शिबीरे राबवुन जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णसेवा द्यावी असे आवाहन केले आहे. यावेळी मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी श्री साईबाबा संस्थानचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक, डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक, डॉ.मैथिली पितांबरे, यांचासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थीत होते.