श्री रामनवमी उत्सवा निमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर श्रींची माध्यान्ह आरती संपन्न झाली.
Undefined
Sunday, April 6, 2025 - 13:45