रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष प्रसिध्द उद्योगपती आकाश अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.