Languages

  Download App

News

News

सन १९६४ पासून श्री साईबाबांचा प्रचार व प्रसार करणारे भारद्वाज स्‍वामी यांचे ओंगुल, विजयवाडा, हैद्राबाद, विद्यानगर येथील आश्रमातील श्री साईभक्‍तांनी शिर्डी येथे येवून दि. ११ जुलै २०२४ ते दि. १८ जुलै २०२४ अखेर रोज सकाळी ०८.०० ते ११.३० वा. पर्यंत श्री साईबाबांच्‍या तेलगु श्री साईसतचरित्राचे श्री साईबाबा संस्‍थानचे शताब्‍दी मंडप येथे पारायण पुर्ण केले. सदरहू पारायणात तेलंगाणा व आंध्रप्रदेश राज्‍यातील जवळपास ३५० साईभक्‍तांनी सहभाग नोंदवला असून मुख्‍य वाचक म्‍हणून भारद्वाज स्‍वामी यांच्‍या कन्‍या एक्किराला भारद्वाज उपस्थित होत्‍या. 

पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Recent News