मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य, मा. खा. सुनिल तटकरे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मा. आ. आशुतोष काळे उपस्थित होते.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.