Languages

  Download App

News

News

रक्तदान करा मोफत व्हीआयपी दर्शन घ्या.
"रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा" या श्री. साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु केलेले आहे. हे दोन्ही रुग्णालय अविरत आरोग्य सेवा देत आहेत येथे अनेक असाध्य आजराच्या रुग्णावर उपचार होत असतात, परंतु रुग्णांना उपचार करत असताना शस्त्रक्रियेच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. त्यामुळे श्री साईबाबा संस्थानने यावर उपाययोजना शोधली असून त्यामुळे शिर्डी मध्ये येणारे सर्व साईभक्तांना श्री साईबाबांचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे यासाठी श्री साईबाबा संस्थानने सुरु केलेल्या रक्त संकलन केंद्रात साईभक्तांनी रक्तदान केले नंतर त्यांना श्रींचे मोफत व्हिआयपी दर्शन मिळणार आहे यासाठी श्री साईबाबा संस्थानचे श्री साईनाथ रक्तपेढी व गेट नं-०८ दर्शन लाईन येथे निरंतर रक्तदान सुरु आहे.
आता यासाठी आणखी एका रक्त संकलन केंद्रांचे श्री साईआश्रम भक्तनिवास (१००० रुम) येथे दि.०५ सप्‍टेंबर २०२४ रोजी संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते उद्घाटन करणेत आले. या तिन्ही ठिकाणी रक्तदान करणारे रक्तदात्यास श्री साईबाबांचे मोफत व्ही आय पी दर्शन त्याच दिवशी मिळणार असुन यामुळे भाविकांना बाबांचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. रक्तदान करा व श्री साईबाबांचे मोफत व्हिआयपी दर्शन घ्या असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. उद्घाटनप्रसंगी साईआश्रम भक्तनिवास विभागाचे अधिक्षक विजयराव वाणी यांचे सहयोगाने ५० साईभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केले या सर्व रक्तदात्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करणेत आला.
या कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ. शैलेश ओक, से.नि, प्र. उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मैथिली पितांबरे, रक्त संक्रमणअधिकारी डॉ. सुप्रिया सुंब, साईआश्रम भक्तनिवासचे अधिक्षक विजयराव वाणी, श्री साईबाबा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे व श्री साईनाथ रुग्णालयाचे प्र. अधिसेविका, नजमा सय्यद, डॉ. अशोक गावित्रे यांचेसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Recent News