Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्थानमधील आयटीआय प्रशिक्षणार्थीची जर्मनी या देशात नोकरीसाठी निवड

शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी" या संस्थेतील ०२ प्रशिक्षणार्थ्यांची जर्मनी या देशात नोकरीसह दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झालेली असून त्यांना याकामी नियुक्तीपत्रे प्राप्त झालेली आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण १० प्रशिक्षणार्थ्यांची निवड झालेली असून यामध्ये संस्थानचे आयटीआय संस्थेतील चि. ओंकार राजेंद्र परभणे याची प्रशिक्षणार्थी मशिनिस्ट ग्राईडर तर चि. करण संजय शिंदे याची प्रशिक्षणार्थी फिटर या व्यवसायाचे कामासाठी निवड झालेली आहे. या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार दिनांक १५/०५/२०२५ रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे शुभहस्ते करणेत आला.

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारे बरेचसे प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्यांना जर्मन देशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत असतांना याकामी जर्मन भाषा शिकण्यासाठी येणारा आर्थिक खर्च हा मोठ्या प्रमाणात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थ्यांना ते शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानने विनामुल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग संस्थेत सुरु केलेले असून याकामी जर्मन भाषा प्रशिक्षकाची नियुक्ती करणेत आलेली आहे.

याप्रसंगी बोलतांना श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी, संस्थेमध्ये पुढील काळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायात प्रवेश घेऊन संस्थेत सुरु असलेल्या विनामुल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा व परदेशात नोकरीची संधी घेऊन आपला आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन केले.

या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी श्री विश्वनाथ बजाज, संस्थेचे प्राचार्य अभयकुमार दुनाखे, गट निदेशक श्री दादा जांभुळकर व व्यवसाय निदेशक श्री उत्तम भडांगे श्री प्रशांत परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Recent News