श्री साईबाबा संस्थानचे वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते चंद्र-पुजा करणेत आली. चंद्र पुजेनंतर रात्रौ १२.१० वाजता श्रींची शेजारती संपन्न झाली, शेजारतीनंतर आरतीसाठी उपस्थित साईभक्तांना पुजेसाठी ठेवलेले दुध प्रातिनिधीक स्वरुपात प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात आदी उपस्थित होते.