Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांचा ५३ वा वाढदिवस व महिला दिनाचे औचित्‍य साधुन श्री साईप्रसादालयातील महिला कामगारांना ५३ तुळस व अन्य वृक्षांचे रोपांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगा

March 12th, 2021

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांचा ५३ वा वाढदिवस व महिला दिनाचे औचित्‍य साधुन श्री साईप्रसादालयातील महिला कामगारांना ५३ तुळस व अन्य वृक्षांचे रोपांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते वाटप करण्‍यात आले.

यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, वैद्यकीय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी, प्रसादालय विभाग प्रमुख विष्‍णु थोरात व कर्मचारी उपस्थित होते.

संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांचाा ५३ वा वाढदिवस व महिला दिनाचे औचित्‍य साधुन श्री साईप्रसादालय विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांच्‍या पुढाकारातुन ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी महिला कर्मचा-यांनी मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांचे वाढदिवसानिमीत्त औक्षण केले. यासाठी भाऊसाहेब थोरात, रविंद्र चौधरी, रमेश गोंदकर आदींसह प्रसादालय कर्मचा-यांचा सहभाग होता.

Recent News