श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे (सिनारे) व त्यांचे पती श्री. प्रविण सिनारे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदिर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.