Languages

   Download App

News

News

साईभक्‍तांनी आपली फसवणूक टाळण्‍यासाठी दर्शनाकरीता संस्‍थानचे अधिकृत संकेतस्‍थळावरुन व दर्शन पास वितरण काऊंटरवरुनच दर्शन पासेस घ्‍यावे. इतरत्र खाजगी व्‍यक्‍तीकडून अथवा संकेतस्‍थळावरुन दर्शन पासेस घेऊ नये. असे पास घेणे अनुचित असून ते वैध देखील नाहीत. फ्री प

साईभक्‍तांनी आपली फसवणूक टाळण्‍यासाठी दर्शनाकरीता संस्‍थानचे अधिकृत संकेतस्‍थळावरुन व दर्शन पास वितरण काऊंटरवरुनच दर्शन पासेस घ्‍यावे. इतरत्र खाजगी व्‍यक्‍तीकडून अथवा संकेतस्‍थळावरुन दर्शन पासेस घेऊ नये. असे पास घेणे अनुचित असून ते वैध देखील नाहीत. फ्री प

January 20th, 2021

शिर्डी -

साईभक्‍तांनी आपली फसवणूक टाळण्‍यासाठी दर्शनाकरीता संस्‍थानचे अधिकृत संकेतस्‍थळावरुन व दर्शन पास वितरण काऊंटरवरुनच दर्शन पासेस घ्‍यावे. इतरत्र खाजगी व्‍यक्‍तीकडून अथवा संकेतस्‍थळावरुन दर्शन पासेस घेऊ नये. असे पास घेणे अनुचित असून ते वैध देखील नाहीत. फ्री पासेस किंवा ऑनलाईन पासेस हे ओळखपत्र किंवा भक्‍तांचा फोटोसह असतात. त्‍यामुळे आपली फसवणूक होणार आहे. असे दलाल आपले लक्षात आल्‍यास त्‍याची माहिती खालील कंट्रोल रुम तसेच हेल्‍पलाईन वर देण्‍यात यावी, असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात आलेले आहे.

   श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी. बरेच साईभक्‍त ऑनलाईन पासेस न घेता शिर्डी येथे येतात. अशा साईभक्‍तांनी ऑफलाईन दर्शन पासेस घेऊन मंदिरात प्रवेश करावा. ऑफलाईन दर्शन पासेस हे गेट नंबर ०२ च्‍या बाजुला श्रीराम पार्कींग, संस्‍थानचे साईआश्रम ०१, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान व शिर्डी बसस्‍थानक येथे उपलब्‍ध असून साईभक्‍तांनी या दर्शन पास वितरण काऊंटरवरुनच ऑफलाईन दर्शन पासेस घ्‍यावे. तसेच सशुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर ०१ च्‍या बाजुला दर्शनरांगेतील जनसंपर्क विभागाच्‍या पास वितरण काऊंटरवरुनच घ्‍यावे.

साईभक्‍तांनी शिर्डी येथे येण्‍यापुर्वी व आल्‍यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा, देणगी व दर्शनाची परिपुर्ण माहीती करीता व आपली फसवणुक टाळण्‍यासाठी संस्‍थानचे हेल्‍पलाईन मोबाईल नंबर ७५८८३७४४६९ / ७५८८३७३१८९ / ७५८८३७५२०४, कंट्रोल रुम मोबाईल नंबर ७५८८३७१२४५ / ७५८८३७२२५४ व WhatsApp नंबर ९४०३८२५३१४ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा. तसेच संस्‍थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्‍थळास भेट द्यावी.

Recent News