Languages

  Download App

News

News

श्री साईबाबा  हॉस्पिटलमध्‍ये  एक  कोटी रुपयाचे  थुलियम लेजर मशिनचे लोकार्पण...

 “रुग्‍णसेवा हिच ईश्‍वरसेवा” या श्री साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्‍थानने श्री साईनाथ रुग्‍णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरु केले. श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत उपचार केले जातात तर श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये अत्‍यल्‍प दरात तसेच शासनाच्‍या योजनेतुन मोफत उपचार दिले जातात. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये कार्डीयाक सर्जरी न्‍युरो, युरो, जनरल सर्जरी, आर्थो सर्जरी, डेंटल सर्जरी या अशा विभागांच्‍या विविध शस्‍त्रक्रिया होतात. अशा शस्‍त्रक्रियेसाठी मोठया प्रमाणात अद्यावत, अत्‍याधुनिक उपकरणांची आवश्‍यकता असते. त्‍याचाच भाग म्‍हणुन श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये युरो शस्‍त्रक्रियेसाठी दि. ३१ ऑक्‍टोबर २०२४ रोजी दुपारी ११.०० वा श्री साईबाबा संस्‍थानचे  मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से) यांचे हस्‍ते एक कोटी रुपयाचे थुलियम लेजर मशिनचे लोकार्पण करण्‍यात आले.
या मशिनमुळे  युरो सर्जरीच्‍या  ( Kidney Stone; Ureteric Stone; Urinary Bladder Stone) या सारख्‍या शस्‍त्रक्रिया अत्‍याधुनिक पद्धतीने कमी वेळेत करण्‍यास मदत होणार आहे तसेच किडनीमध्‍ये कुठलेही छिद्र न करता Kidney Stone च्‍या शस्‍त्रक्रिया सहजतेने करणे शक्‍य होणार आहे. त्‍यामुळे येथे येणा-या गरीब व गरजु रुग्‍णांना पुणे, मुंबई येथे या शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी जाण्‍याची आवश्‍यकता भासणार नाही तसेच अत्‍याधुनिक पद्धतीने कमी दरात उपचार होणार असल्‍याकारणाने रुग्‍णांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ शैलेश ओक, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.दिपक कांदळकर, जनरल सर्जन डॉ रंजित भोजने, डॉ. अजिंक्‍य पानगव्‍हाणे, युरो सर्जन डॉ. वैभव कांबळे, डॉ.योगेश तोरकडी, मेक्झिलोफेशिअल सर्जन, डॉ. किरण खांदे, भुलतज्ञ  डॉ. संतोष सुरवसे, डॉ. निहार जोशी, डॉ. गायत्रीलक्ष्‍मी नागपुरे प्र.अधिसेविका निशा बारसे, जनसंपर्क अधिकारी(रुग्‍णालये) श्री सुरेश टोलमारे तसेच जनरल सर्जरी ऑपरेशन थिएटरमधील सर्व कर्मचारी उपस्‍थीत होते.

Recent News