रशिया व जर्मनी येथील २३ परदेशी साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे आदी उपस्थित होते.