एका दिवसात नाशिक ते शिर्डी पायी यात्रा....
विक्रम पांडुरंग कावळे ५८ वर्षीय साईभक्ताने दत्त मंदीर नाशिकरोड ते श्री साईबाबा मंदीर शिर्डी असा ७५ किलोमीटर पायी प्रवास एका दिवसात करत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.
विक्रम कावळे यांनी ते २९ वर्षांपासून म्हणजेच सन १९९६ सालापासून प्रत्येक वर्षी १४ ऑगस्ट किंवा १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता प्रवासास सुरुवात करुन सायंकाळी ६ वाजता शिर्डी येथे पोहचत असलेबाबत सांगीतले.
Undefined
नाशिक ते शिर्डी एका दिवसात पायी! ५८ वर्षीय साईभक्त विक्रम कावळे यांनी केली अविश्वसनीय यात्रा
Wednesday, August 14, 2024 - 20:45