Languages

   Download App

शिर्डीत श्री गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

शिर्डीत श्री गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ १०.०० ते १२.०० वाजता ह.भ.प.सौ. स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, पुजारी, कर्मचारी व साईभक्‍त उपस्थित होते. त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.

Undefined
साईबाबा मंदिरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव: ह.भ.प. सौ. स्मिता आजेगावकर यांचे कीर्तन
Saturday, August 16, 2025 - 10:15