Languages

   Download App

श्री साईबाबा संस्थानला महिंद्रा कंपनीची ₹28 लाख किमतीची 'EV9' इलेक्ट्रिक कार देणगी

श्री साईबाबा संस्थानला महिंद्रा कंपनीची ₹28 लाख किमतीची 'EV9' इलेक्ट्रिक

शिर्डी :
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. अनेक भाविक आपली श्रद्धा आणि भक्तिभाव विविध प्रकारच्या दानाद्वारे श्री साईबाबा संस्थानकडे अर्पण करीत असतात.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या उत्पादनातील नव्याने लॉन्च झालेली वाहने संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्याची परंपरा जपली आहे. त्याच परंपरेनुसार नुकतीच लॉन्च झालेली महिंद्रा EV9 इलेक्ट्रिक कार कंपनीतर्फे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली आहे.

आज या गाडीचे पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सीएफओ श्री. राजीव गोयल आणि एरिया सेल्स मॅनेजर श्री. गणेश उसकुले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थानचे वाहन विभाग प्रमुख श्री. अतुल वाघ व जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लोखंडे उपस्थित होते. पूजनानंतर कंपनीच्या प्रतिनिधींच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडिलकर यांनी कारची चावी स्वीकारली. यानंतर संस्थानच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सुमारे ₹28 लाख किंमतीची EV9 इलेक्ट्रिक कार संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे. यापूर्वीही महिंद्रा अँड महिंद्राने 16 प्रवासी वाहने, 2 दुचाकी, 2 ट्रॅक्टर आणि 3 मालवाहतूक वाहने अशी एकूण 23 वाहने संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण केलेली आहेत.

Undefined
श्री साईबाबा संस्थानला महिंद्रा कंपनीची ₹28 लाख किमतीची 'EV9' इलेक्ट्रिक कार देणगी
Monday, September 29, 2025 - 12:00