श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री दिपक केसरकर, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.
Undefined
साईबाबा पुण्यतिथी: श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते आराधना विधी
Saturday, October 12, 2024 - 11:45