मा.ना.श्री चिराग पासवान, केंद्रीय मंत्री, अन्न प्रक्रिया उद्योग, भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी त्यांचा शाल व श्रीसाईमुर्ती देवून सत्कार केला. त्यावेळी मा.खा.डॉ सुजय विखे पाटील व उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.