श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीम. अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, मंदिर पुजारी व साईभक्त उपस्थित होते.